🌟राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संकेत ; तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?🌟
नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपासह मित्र पक्षांच्या महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर भारतीय जनता पक्षाने स्थानिक जनता स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे गत पावणेतीन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असून राजकीय पक्षांना २२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीची प्रतीक्षा आहे. मात्र 4 जानेवारी रोजीच सुनावणी होण्याची शक्यता असून,तीन महिन्यांत निवडणुका व्हायला हव्यात असा प्रयत्न असल्याचे वक्तव्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांबाबत संकेतच दिले आहेत.
नागपुरात भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी 'मन की बात' मांडली. विधानसभेतील विजयामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि भाजपसाठी 'फेव्हरेबल' वातावरण आहे त्यामुळेच याचा फायदा उचलून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयाचे पक्षाकडून नियोजन सुरु करण्यात आले आहे......
0 टिप्पण्या