🌟विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप खा.डॉ.गोपछडेंनी सारंगी यांना व्हीलचेअरवरुन बाहेर काढले🌟
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. यावरुन काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी रान उठवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदारांनी काँग्रेसवरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत गुरुवारी, दि.१९ रोजी संसदेत निषेध आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असताना विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की के ल्याचा गंभीर आरोप भाजपचे खा. प्रतापचंद्र सारंगी यांनी केला. तसेच भाजपचे दुसरे खा.मुकेश राजपूत हे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार चालू आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला. त्यामुळे तो खासदार माझ्या अंगावर पडला. आणि माझ्या डोक्याला जखम झाली, असा दावा प्रतापचंद्र सारंगी यांनी के ला. नव्या संसदेच्या मकरद्वाराच्या परिसरात हा धक्काबुकीचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. प्रतापचंद्र सारंगी जखमी झाल्यानंतर भाजपच्या काही खासदारांनी मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी यांनाही धक्काबुक्की केल्याचे समजते. राहुल गांधींनी एका खासदाराला माझ्या अंगावर ढकलले. त्यामुळे मी खाली पडलो आणि जखमी झालो. मी पायऱ्यांवर उभा होतो. त्यावेळी राहुल गांधींनी धक्का दिलेला खासदार माझ्या अंगावर पडला, असा भाजपचे खा. सारंगी यांचा दावा आहे. दरम्यान, या प्रकारानंतर प्रतापचंद्र सारंगी यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रताप सारंगी यांच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यांच्यावर सध्या दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर भाजप खा. मुकेश राजपूत यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, शिवराजसिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी इस्पितळात पोहचले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात इंडिया आघाडीकडून संसदेत आंदोलन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. अमित शहा यांनी माफी मागावी. आणि पदाचा राजीनामा द्यावा. यासाठी इंडिया आघाडीचे आंदोलन सुरु आहे. या घटनेनंतर इंडिया आघाडीचे खासदारही आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षाचे खासदार मकरद्वाराच्या भिंतीवर चढले. नवीन संसदेच्या परिसरात पहिल्यांदाच भिंतीवर चढून आंदोलन करत आहेत. या सगळ्या घटनेनंतर राहुल गांधी यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, मी संसदेच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी भाजप खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. ते मला धमकावत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. मला संसदेत जाण्याचा अधिकार आहे. भाजप संविधानावर आक्रमण करत आहे. हा मूळ मुद्दा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
💫विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधींचा उद्दामपणा - खासदार डॉ.अजित गोपछडे
उद्दामपणा काय असतो ते आम्हाला डोळ्याने पाहायला मिळाले. हिंदुस्थान आमची जहागीर आहे, अशा रीतीने विचार करणारी मानसिकता आहे. केंद्राचा अध्यादेश फाडणारे हे लोक आहेत. काँग्रेसने दोनदा डॉ. बाबासाहेबांना लोकसभेत येऊ दिले नाही. प्रताप सारंगी स्वभावाने गरीब आहेत. ते पडले तर त्यांना बघायला देखील राहुल गांधी थांबले नाहीत. राहुल गांधी लोकांना ढकलून ढकलून पुढे जात होते. जगाचा मालक असल्यासारखे राहुल गांधी पुढे जात होते. त्या ढकला ढकलीत खा. प्रतापचंद्र सारंगी हे खाली पडले. डॉक्टर या नात्याने मी त्यांना व्हील चेअरवर बसवले असे भाजपचे खा. अजित गोपछडे यांनी सांगितले.....
0 टिप्पण्या