🌟बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाच्या मारेकऱ्यांची सिआयडी मार्फत चौकशी करा....!


🌟पुर्णेतील सकल मराठा समाजाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन🌟

पुर्णा :  बिड जिल्ह्यातल्या केज तालूक्यातील मस्साजोग येथील  सरपंच तथा मराठा समाज आरक्षणातील चळवळीचं धडाडीचे नेतृत्व असलेले संतोष देशमुख यांचे गुंडप्रवृत्तीच्या ज्या आरोपींने दिवसाढवळ्या अपहरण करुन राक्षसी क्रूरपणे त्यांच्या शरिरावर घाव घालून निर्घृण खून करण्यात आला.ही बाब निंदनीय असून लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह ईतर आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करुन शासन स्तरावरून कठोर कारवाई करावी.

हत्येतील आरोपींना राजकीय वरदहस्त देणाऱ्यांना सहआरोपी करावे,केजचे पोलिस निरीक्षक,उपनिरीक्षक यांचे निलंबन करुन त्यांना सहआरोपी करावे,सदर खुन प्रकरणाची सिआयडी मार्फत चौकशी करुन प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे.घटनास्थळाची प्रत्यक्षदर्शी शिवराज देशमुख यांना पोलिस संरक्षण द्यावे,अशा मागणीचे निवेदन पूर्णा तालूका सकल मराठा समाजाच्या वतीने १३ डिसेंबर रोजी नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या