🌟नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे सेवानिवृत्त ग्रंथपाल विजय जोशी यांचे निधन......!


🌟त्यांचे मागे पत्नी,मुलगा,दोन मुली,जावई,सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे🌟

नांदेड : नांदेड शहरातील यशवंत नगर विस्तारित नजीकच्या परिमल नगर येथील रहिवासी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल विजय पंडितराव जोशी कोंढूरकर वय ७६ वर्ष यांचे काल शुक्रवार दि.०६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १०.०० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे 

त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार दि.०७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३०  वाजता परिमल नगर येथील राहते घर येथून निघणार आहे गोवर्धन घाट येथील स्मशान भूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.अत्यंत मनमिळाऊ,हसतमुख व्यक्तिमत्व असलेले विजय जोशी हे परिमल नगर चे संथापक सदस्य होते, त्यांचे मागे पत्नी,मुलगा,दोन मुली,जावई,सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे गुजराती प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत सह शिक्षिका सुरेखा जोशी यांचे ते पती होत त्यांचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..‌‌...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या