🌟एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेतून गृहखात्याच्या मागणीवर ठाम असल्याचा स्पष्ट मेसेज🌟
✍️ मोहन चौकेकर
💫 लाडकी बहीण योजना रक्षाबंधनाला सुरु झाली, रक्षाबंधनाच्या दिवशीपासूनच रक्कम वाढवायची, सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच बहिणींना 1500 मिळणार की 2100 रुपये मिळणार हे कळेल ; नवीन मुख्यमंत्री तशी घोषणा करतील
💫 महायुतीत मंत्री होण्यासाठी भाजपासह महायुतीच्या सर्व आमदारांना जावे लागणार गृहमंत्री अमित शाहांच्या कसोटीतून, अमित शाहांनी मागवलं संभावित मंत्री होऊ इच्छिणाऱ्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड
💫 एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून गृहखात्याच्या मागणीवर ठाम असल्याचा स्पष्ट मेसेज दिला, बॉडी लँग्वेजही बदलली ; एकनाथ शिंदेंनी आजच्या साऱ्या बैठका रद्द केल्या, डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यानं ठाण्यातच करणार मुक्काम
💫 मी उपमुख्यमंत्री होण्याच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या, श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण, पक्षाचं काम करण्यासाठी केंद्रीय मंत्रिपद नाकारल्याची माहिती ; ज्या मागण्या शिंदेसेना करतायेत त्यावर भाजपने ठरवलं तर एका मिनिटात त्यांना चिरडून टाकतील, संजय राऊतांची बोचरी टीका
💫 बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडले
💫 संघाचे एजंट असलेल्या नाना पटोलेंनी नागपुरातील काँग्रेस जाणूनबुजून खिळखिळी केल्याचा बंटी शेळकेंचा आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग ; विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
💫 गरज सरो वैद्य मरो, हीच भाजपची भूमिका; सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांचा फोन मात्र मतदारसंघातील कामं आणि निधीसाठी एकदाही फोन केला नाही, बच्चू कडूंचा आरोप
💫 ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं ठरवणाऱ्या सोलापुरातील मारकडवाडीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू, मतदान घेतल्यास कारवाई करण्याचा प्रशासनाचा आदेश
💫 राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, तळ कोकण, मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज
💫 2024 मध्ये करिअरचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, आता 37व्या वर्षी अभिनयातून संन्यास घेण्याची घोषणा, अभिनेता विक्रांत मेस्सीची शॉकिंग पोस्ट
💫 ह्यांना कळत कसं नाही, मरणार आहात एक दिवस, जाणार आहात तुम्ही ; राजकीय नेत्यांवर नाना पाटेकरांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या