🌟महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेतील शिवसेना गटनेतेपदी आमदार हेमंत पाटील यांची निवड....!

 


🌟विधानसभा परिषद गटनेते पदावर निवड झाल्याबद्दल आ. हेमंत पाटील यांचे सर्वस्तरातून होतेय अभिनंदन🌟


नांदेड - नांदेड येथील माजी आमदार तथा हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार व विधान परिषदेचे विद्यमान आमदार हेमंत पाटील यांची शिवसेनेचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्यावतीने विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड केली आमदार हेमंत पाटील यांची गटनेते पदावर निवड झाल्याबद्दल नांदेड जिल्ह्यासह हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसह त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) तथा विधानपरिषद आमदार हेमंत पाटील यांच्या बहुमानात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. पाटील यांना नुकत्याच्या झालेल्या नांदेड जिल्ह्यातील ३ आमदार आणि हिंगोली जिल्ह्यातील १ आमदार निवडून आणण्याची जबाबदारी दिली होती. ती जबाबदारी आमदार हेमंत पाटील यांनी अगदी चोखपणे पार पाडली. मुख्यमंत्र्यांचा शब्द शिरसावंद्य मानून आ. हेमंत पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला मिळवून दिलेले यश आ. हेमंत पाटील यांचे पक्षातील वजन वाढवणारे आहे. आ. हेमंत पाटील यांच्या सांगण्यावरून दिलेल्या चार जागा निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा आ. हेमंत पाटील यांच्यावर दिली होती. नांदेड उत्तरमध्ये बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिण आनंद बोंढारकर, हदगाव बाबुराव कदम कोहळीकर, कळमनुरी संतोष बांगर यांचा समावेश होता. या चारही जागांवर हेमंत पाटील यांच्या नियोजनामुळे यश मिळाल्याचे सर्वश्रूत आहे. त्यामुळेच आ. हेमंत पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेच्या गटनेतेपदी निवड केली आहे. यापूर्वी आ. पाटील यांना माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्रिपद बहाल केले, तसेच हळद संशोधन केंद्रास ८०० कोटींचा भरीव निधी मंजूर करून त्यांना विधान परिषद सदस्यपदी राज्यपाल कोट्यातून वर्णी लावली आहे. आता गटनेतेपदी निवड केल्यामुळे नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या