🌟परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभू दिपके तर कार्याध्यक्षपदी लक्ष्मण मानोलीकर....!


 🌟डिजीटलचे मिडियाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती ; खेळीमेळीच्या वातावरणात झाली निवड🌟

✍️ मोहन चौकेकर

परभणी : मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाची आज द्वैवार्षिक कार्यकारिणी निवडण्यात आली. शहरातल्या सावली शासकीय विश्रामगृहावर संपन्न झालेल्या बैठकीत ही कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. या बैठकीसाठी डिजीटल मिडीया विभागाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांची विशेष उपस्थिती होती.  मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली  ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत परभणी जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रभू दिपके, कार्याध्यक्षपदी लक्ष्मण मानोलीकर तर प्रदेश प्रतिनिधी म्हणून धाराजी भुसारे यांची निवड करण्यात आलीय. तर महानगर जिल्हाध्यक्षपदी शिवशंकर सोनुने,  डिजीटल मिडीया जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शेख इफ्तेखार तर महानगर अध्यक्षपदी राहूल वाहिवाळ यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे सर्वांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी देशाचे माजीपंतप्रधान मनमोहन सिंग, परभणीतील लोकनेते विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

आज जिल्हाभरातील पत्रकाराच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी, ज्येष्ठ पत्रकार मदन कोल्हे आदींची उपस्थिती होती. या बैठकीत पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभू दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, प्रदेश प्रतिनिधी धाराजी भुसारे, उपाध्यक्ष म्हणून विठ्ठल वडकुते, शेख माजेद जिंतूर, किरण घुंबरे पाटील पाथरी, प्रकाश साळवे, सतिष टाकळकर पूर्णा, शिव मल्हार वाघे सोनपेठ, लक्ष्मीकांत बनसेाडे, कोषाध्यक्ष मोईन खान, सहकोषाध्यक्ष सुरेंद्र पाथरीकर, सरचिटणीस मोहमद इलियास सेलू, चिटणीस रामचंद्र कोठेकर, प्रसिध्दीप्रमुख सुधाकर श्रीखंडे,  सहचिटणीस उत्तम बोरसुरीकर, संघटक फहीम काजी, सहसंघटक जकीयोद्दीन खतीब, समन्वयक भूषण मोरे, निमंत्रक मंचक खंदारे,  तर सदस्य म्हणून माणिकराव शिंदे, देवानंद वाकळे, नाझीम सिध्दीकी, महेमुद खान, प्रशांत खंदारे आदींची निवड करण्यात आलीय. तर महानगर कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शिवशंकर सोनुने, कार्याध्यक्ष पांडूरंग अंभोरे, सचिव संघपाल आढागळे, उपाध्यक्ष मंदार कुलकर्णी, विजय चट्टे, कोषाध्यक्ष अनिल दाभाडकर, संघटक मयुर देशमुख, सहसचिव आकाशदिप लंगोटे, समन्वयक सुदर्शन डाके, सहसमन्वयक दिलीप मालसमिंदर, प्रसिध्दीप्रमुख अरुण रणखांबे, विद्यासागर साळवे आदींची निवड करण्यात आलीय.

डिजीटल मिडीया विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी शेख इफ्तेखार यांची निवड करण्यात आली तर  कार्याध्यक्ष बाळासाहेब घिके, सचिव आनंद पोहनेरकर, सहसचिव सय्यद अखील, कोषाध्यक्ष शेख महेबुब, संघटक राजू कर्डीले, उपाध्यक्ष बालाजी कांबळे, सय्यद आयुुब, समन्वयक रियाज कुरेशी, सहसमन्वयक कलीम कुरेशी, प्रसिध्दीप्रमुख सय्यद अथर, तर सदस्य म्हणून बाबरोदीन सिध्दीकी, इद्रीस बगे, सय्यद जमिल, आदींची निवड करण्यात आली. डिजीटल मिडीया महानगर कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी राहूल वाहीवाळ, कार्याध्यक्ष अमर गालफाडे, सचिव सय्यज जमिल सय्यद हनिफ,  उपाध्यक्ष राहूल पुंडगे, सहसचिव शंकरराव झाटे, संघटक नजीब सिध्दीकी, सहसंघटक सय्यद खिजर स. नाजेम, सहसंघटक मोहमद परवेज अमीर खुसरो, कार्यावाह शैलेश डहाळे, सदस्य संजय घनसावंत, शेख अजहर , शेख इस्माईल अ.मजीद, तैय्यब फयाज खान पठाण, धनंजय धबाले, संदिप ढाले आदींची निवड करण्यात आली.......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या