🌟भारताचे आदर्श पुर्व प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंघ यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार.....!

 


🌟राजघाटाजवळील सरकारी स्मशानभूमीत डॉ.मनमोहन सिंग यांच्यावर करण्यात येणार अंत्यसंस्कार🌟


नवी दिल्ली : भारताचे पुर्व प्रधानमंत्री जगविख्यात अर्थतज्ज्ञ सरदार डॉ.मनमोहन सिंघ यांचे गुरूवार दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांचे पार्थिव आज शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी सकाळी काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल. सकाळी ८.३० वाजतापासून काँग्रेस मुख्यालयात कार्यकर्ते आणि नागरिकांना अंत्यदर्शन घेता येणार आहे.

त्यानंतर ९.३० वाजता काँग्रेस मुख्यालयातून डॉ.मनमोहन सिंघ यांची अंत्ययात्रा सुरु होईल. राजघाटाजवळील सरकारी स्मशानभूमीत डॉ.मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली.राष्ट्रपती,उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह देशभरातील नेते आणि मान्यवरांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. केंद्रीय मंत्रीमंडळाने आणि काँग्रेस कार्य समितीने डॉ.मनमोहनसिंघ यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मंजूर केला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या