🌟बिड जिल्ह्यातील अर्धवट रेल्वे लोहमार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार :अर्थसंकल्पात २७५ कोटी रुपयांची तरतूद.....!


🌟जिल्हावासियांचे रेल्वेचे स्वप्न २०२५ अखेरीस पूर्ण होण्याची चिन्ह🌟 

बिड :- बिड अर्धवट रेल्वे लोहमार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हं दिसू लागली असून या लोहमार्गाच्या कामासाठी अर्थसंकल्पात २७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने बिड जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक वर्षांपासून बाळगलेले रेल्वेचे स्वप्न २०२५ अखेरीस पूर्ण होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत नगर ते राजुरी या रेल्वे मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून डिसेंबर अखेर या लोहमार्गावरील राजुरीपर्यंत चाचणी घेण्यात येणार आहे. पुढील वर्षामध्ये बीडपर्यंत रेल्वे येण्याची शक्यता असल्याने आगामी वर्षात बिडकरांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे विघनवाडी ते राजुरी या २२ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. दोन दिवसापासून मालगाड्या या मार्गावर धावत आहेत. या महिन्याच्या अखेरीस प्रवाशी रेल्वे मार्फत चाचणी करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अहिल्यानगर-बीड-परळी या रेल्वेचे स्वप्न बीडकरांनी अनेक वर्षापासून जागवले आहे. अनेक घडामोडी मागण्या काळात झाल्या मात्र रेल्वे कधी येणार याबाबत काहीच सांगता येत नव्हते. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये रेल्वेच्या कामाला प्रचंड गती मिळाली असून, आता दीड करायचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. २०२५ या नव्या वर्षात बीड साठी रेल्वे धावू शकते. त्यातही येत्या दोन महिन्यातच बीड पर्यंतचे पूर्ण काम होणार असून किमान बीड पर्यंत रेल्वेची ये जा सुरू होऊ शकते. १९९५ ला अहिल्यानगर-बीड-परळी मार्गाला मंजुरी मिळाली होती. परंतु या रेल्वेमार्गासाठी भरीव निधी मिळत नसल्याने काम रखडले होते. नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देशातील मागास भागात मागे पडलेल्या प्रकल्पांचा गती शक्ती पोर्टलमध्ये समावेश केला. त्यात बीड जिल्ह्यातील अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गही गती-शक्तीमध्ये घेण्यात आला. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडून या रेल्वेमार्गाचा फॉलोअप घेण्यास सुरुवात झाली. त्यातच यंदा केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा रेल्वेमार्ग २०२५ मध्ये पूर्णत्वाकडे जात आहे.

अहिल्यानगर-बीड परळी रेल्वेमार्गाची अंमळनेर ते विघनवाडी अशी ३३.१२ किलोमीटरची चाचणी ९ ऑगस्ट २०२४ रोजी पूर्ण झाल्यांनतर आता शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड अशा ३५ किलोमीटर अंतरापैकी २२ किमीचे नवगण राजुरी गावापर्यंत रेल्वेचे रूळ अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२४ अखेर रेल्वेची चाचणी होणार आहे. पुढच्या टप्यातील नवगण राजुरी ते बीड अशा १३ किलोमीटर अंतरात रेल्वे रूळ अंथरण्याचे काम सध्या प्रगतिपथावर असून जानेवारी २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात या मार्गावरील सुरक्षेची चाचणी घेण्यात येणार आहे.

🌟नगर व बीड या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक व्यापार आणि उद्योगांना असे होणार रेल्वेचे फायदे :-

नगर व बीड या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळणार आहे. मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास मराठवाड्यातून येणाऱ्या प्रवाशांना मुंबई, पुणे रेल्वे अंतर जवळ होणार आहे. नगर व मराठवाडा विभाग दीड वर्षात जोडला जाऊन पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. बीड, अहिल्यानगर + जिल्ह्यातील शेती आणि उद्योगांना फायदा, स्थानिक रोजगार निर्मिती होणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या