🌟देऊळगाव (दुधाटे) येथील आदर्श शाळा म्हणून नावाजलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत घेण्यात आला कार्यक्रम🌟
पुर्णा (दि.२३ डिसेंबर २०२४) - पुर्णा तालुक्यातील आदर्श शाळा उत्कृष्ट स्मशानभूमी म्हणून तालुक्यातील नावाजलेले गाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देऊळगाव (दुधाटे) या आदर्श उत्कृष्ट शाळेमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत पंधरवाडा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायत जनजागृती पंचायत चे पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन आवरगंड अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे ध्येय धोरण आणि ग्राहकांनी जागरूक कसे राहावे यावर प्रस्ताविक केले प्रमुख पाहुणे सय्यद सलीम सुहागनकर राधाताई दुधाटे मधुरा गरड हे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक आनंद चौधरी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन परभणी यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की जन्मापासून तर मरेपर्यंत आपण सर्व ग्राहक आहोत ग्राहकांनी नेहमी जागृत व डोळस पद्धतीने वस्तू घेतल्या पाहिजे वस्तूची किंमत वस्तू तयार होणारा दिनांक आणि वस्तू किती दिवसात आपल्याला उपयोगात येणार आहे व बंद पॅकेटचे वस्तू ग्राहकांनी घेतल्या पाहिजे असे त्यांनी यावेळेस मार्गदर्शन केले मनोज पैठणे औषधी निरीक्षक ग्राहकांनी घेतलेल्या प्रत्येक मेडिकल वरील गोळ्या औषधी यावरील कंपनी पावती घेतल्याशिवाय कुठलाही मेडिकलवर गोळ्या औषध घेऊ नये ही ग्राहकांची खूप मोठी जनजागृती असते आम्ही जेव्हा मेडिकल तपासणीसाठी जेव्हा जातो तेव्हा असे लक्षात येते की रुग्ण हा मेडिकलची पावती न घेताच मेडिकल घेऊन जातो असं न करता प्रत्येक रुग्ण ग्राहकाने मेडिकल वरून पावती घ्यावी अशी त्यांनी मार्गदर्शन केले राजेश देसाई आरोग्य अधिकारी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सर्वप्रथम रुग्ण ग्राहक हा कुठल्याही डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकल स्टोर वर जातात व औषध गोळ्या घेतात ह्या गोळ्यांमुळे आपल्याला शरीरावर कुठल्या प्रकारचा दुष्परिणाम होणार आहे हे त्या मेडिकल स्टोर वाल्यांना न कळल्यामुळे रुग्ण ग्राहक म्हणून आपली फसवणूक होते म्हणून असे करण्यापासून टाळावे कार्यक्रमात उपस्थिती अश्विनी मुदगलकर कृषी सहाय्यक एस आर तमलवाड आरोग्य सेविका पत्रकार राहुल पुंडगे पत्रकार सचिन सोनकांबळे सिंधुताई लोमटे आशा वर्कर तथा उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती नवनाथ दुधाटे सदस्य भगवान दुधाटे विठ्ठल दुधाटे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याध्यापक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबनराव पारवे शिक्षक गंगाधर लांडे बळीराम कदम मुंजा देव मुंडे शत्रगुण मिराशे शिवकुमार बोडगमवार वैशाली शिसोदे शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी केला व आभार राधाताई दुधाटे यांनी केले
0 टिप्पण्या