🌟सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी त्यांनी शासनाचे वेधले लक्ष🌟
✍️ मोहन चौकेकर
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी मतदारसंघातील विकासासाठी महत्त्वपूर्ण मुद्दे सभागृहात प्रभावीपणे मांडले.
* प्रमुख मुद्दे :-
- बाह्यवळण रस्ता व राजुर घाटातील वाहतूक :
बुलढाणा, चिखली, मलकापूर या राष्ट्रीय महामार्गांसाठी काम प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत, बुलढाणा शहराचा बाह्यवळण रस्ता आणि राजुर घाटातील वाहतुकीचा त्रास कमी करण्यासाठी त्वरित चौपदरीकरण होणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन प्रवास सुलभ होईल.
- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देयकांची समस्या :
सार्वजनिक बांधकाम विभागातील पूर्ण झालेल्या कामांची देयके अद्याप अदा न झाल्याने या कामांवर काम करणाऱ्या ठेकेदार व मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ती देयके त्वरित दिली जावीत, अशी मागणी.
- नाबार्ड योजनांमधील सुधारणा :
नाबार्डच्या माध्यमातून ग्रामीण भागांमध्ये पुलांसह ब्रिज कम बंधारे उभारले जावेत, जेणेकरून रस्ते व जलसंधारण या दोन्ही सुविधा उपलब्ध होतील.
- खनिकर्माचा निधी :
खनिकर्म विभागातून मिळणारा निधी जिल्हा परिषदेच्या शाळा बांधणीसाठी वापरल्यास शाळांच्या सुविधा सुधारतील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल.
- एमआयडीसी व ऊर्जा विभागाचे प्रश्न :
मोताळा एमआयडीसी मंजूर झाली आहे, मात्र बुलढाणा एमआयडीसीसाठी शासनाने तातडीने पावले उचलावी. याशिवाय गावांतील वीज वितरणासाठी तारा, विजेचे पोल आणि रोहित्रांचे अपग्रेडेशन करण्यात यावे.
- कृषी योजनांवरील प्रलंबित देयके :
कृषी विभागाच्या विविध योजनांचे लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. ती लवकर अदा करण्याचे निर्देश द्यावेत.
धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी या सर्व मुद्द्यांसाठी सभागृहात बुलंद आवाजात मागणी केली आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या