🌟बांगलादेशातील हिंदूंवर होणारा अन्याय केंद्र सरकारने मध्यस्थी करून तात्काळ थांबवावा अशी निवेदनात मागणी🌟
परभणी (दि.०६ डिसेंबर २०२४) - बांगलादेशात कट्टरपंथी धर्मांध शक्तींकडून अल्पसंख्याक हिंदू सिख बौद्ध व इतर समाज बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांनी अक्षरशः कळस गाठलाय केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेऊन हिंदूंवरील हल्लें तात्काळ थांबवण्याच्या दृष्टीने कठोर पाऊल उचलावी त्वरित शिवसेना मोठे जनआंदोलन उभारेल असा इशारा परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी आपल्या लेटरहेडवरील निवेदनाद्वारे परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्र सरकारला दिला आहे.
बांग्लादेशात बांगलादेश सरकारकडून हिंदू धर्मिय संत स्वामी चिन्मयदास प्रभुजी यांच्यावर बेकायदेशीर कारवाई होते ? त्यांना अटक केली जाते ? बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू,शीख, बौद्धांवर सातत्याने होणारे हल्ले चिंताजनक असुन अल्पसंख्याकांचे दमण केले जात आहे बांगलादेशी पंतप्रधान आपल्या देशात आश्रयाला असतांना केंद्र सरकार त्या ठिकाणच्या हिंदूंवरील अत्याचाराबाबत शांत का आहे ? देशभरात याबाबत जनमानसात तीव्र भावना आहे. याची गंभीर दखल घेऊन बांगलादेशातील अन्याय केंद्र सरकारने मध्यस्थी करून तात्काळ थांबवावा अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे....
0 टिप्पण्या