🌟नांदेड महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण🌟
नांदेड (दि.२५ डिसेंबर २०२४) - नांदेड शहरातील लोहार गल्ली परिसरातील एका बेंटेक्स ज्वेलरी दुकानास आज बुधवार दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी ०८.३४ वाजेच्या सुमारास भयंकर आग लागल्याची घटना घडली या लागलेल्या भिषण आगीत लाखो रुपयांचे बेंटेक्स ज्वेलरी साहित्य जळून खाक झाले सदरील घटनेची माहिती मिळताच नांदेड महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने जेसीबीच्या सहाय्याने भिंत पाडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले त्यामुळे पुढील होणारे भयंकर नुकसान टळले आहे.
शहरातील लोहार गल्ली परिसरात लक्ष्मी प्लॉस्टीक सेंटर ॲण्ड वेंटेक्स ज्वेलरी या नावाने दुकान आहे अन्डरग्राऊंडमध्ये असलेल्या दुकानास आज बुधवारी सकाळी ८:३४ च्या दरम्यान अचानक आग लागली घटनेची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन १२ बंम्बांच्या सहाय्याने तट भिंत तोडून आग विझविण्यामध्ये यश मिळविले त्यांना पोलीस दलातील अधिकाऱ्यांनीही मदत केली. सदर ज्वेलरीच्या दुकानाचे ७० ते ७५ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर दुकानातील ३ ते ४ लाख रुपयाचे नुकसान रोखण्यात यश आले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या माळावर मालमत्तेचे मालक राम वसमतकर हे राहतात. त्यांच्या घरातील साहित्याला मात्र या आगीचा धोका जाणवला नाही.
आग विझविण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश कांवळे, मोहमद सादिक, पवळे, शिंदे, ताटे, किरकन, तोटावाड, खेडकर यांनी परिश्रम घेतले आहे. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वेलरीचे साहित्य जळाल्यामुळे दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी संबंधीत दुकानदाराने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. दुकान मालक राजेंद्र वसंतराव वोवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नोंद घेतली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.......
0 टिप्पण्या