🌟सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करा....!


🌟पुर्णेतील संतप्त आंबेडकरवादी संविधान प्रेमी मोर्चेकरांनी राष्ट्रपतींकडे केली निवेदनाद्वारे मागणी🌟

पुर्णा (दि.१५ डिसेंबर २०२४) : परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबनेच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनातील आंदोलनकारी सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याने आज रविवार दि.१५ डिसेंबर रोजी तमाम आंबेडकरवादी संविधान प्रेमी जनसमुदायाकडून पुर्णेत बंद पुकारण्यात आला या बंदमध्ये शहरातील व्यापारी बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद देत आपापली व्यवसायिक प्रतिष्ठान स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवल्याने संपूर्ण शहर कडकडीत बंद होते.

यावेळी तमाम आंबेडकरवादी संविधान प्रेमी जनसमुदायाने मोर्चेकऱ्यांनी शहरातील बुद्ध विहारा पासून शहराच्या प्रमुख मार्गाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पर्यंत भव्य असा निषेध मोर्चा काढण्यात आला त्याचे सभेत रूपांतर झाले यावेळी जेष्ठ रिपाई नेते व आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे,भदंत पय्यावंश,माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड,वंचित बहुजन आघाडीचे नेते दादाराव पंडीत यांनी उपस्थित मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करून शांततेचे आवाहन केले.

या प्रसंगी पुर्णा तहसिल चे नायब तहसीलदार प्रशांत धारकर, पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक विलास घोबाडे यांचे मार्फत राष्ट्रपतींना एक निवेदन पाठविण्यात आले ज्यात शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलीसाना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना कडक शासन करावे ही प्रामुख्याने मागणी करण्यात आली संविधानाची विटंबना करणाऱ्या विकृतबुध्दीमत्तेचा समाजकंटक सोपान पवार याच्यावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणातील समाजकंटक आरोपी सोपान पवार याची स्थावर व जंगम मालमत्ता शासनाने जप्त करावी.अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर ॲड.धम्मा जोंधळे,साहेबराव सोनवणे,श्रीकांत हिवाळे,दिलीप गायकवाड,ॲड.सिद्धांत गायकवाड,आनंद वायवल,रवि गायकवाड,चक्रवर्ती वाघमारे,ॲड.हिरानंद गायकवाड,मुकुंद पाटील,विनोद गायकवाड,प्रवीण कनकुटे,अशोक वाघमारे,अमोल गायकवाड,दीपक थोरात,विजय जोंधळे,श्यामराव जोगदंड,गौतम काळे,विरेष कसबे,दीपक रणवीर आदींसह असंख्य तमाम आंबेडकरवादी संविधान प्रेमींच्या स्वाक्षऱ्या असून या निषेध मोर्चात प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो महिलांनी मोर्चात सहभाग नोंदविला सदरील मोर्चा अत्यंत शांततेत संपन्न झाला........

संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या