🌟परभणीत श्री खंडोबा यात्रा महोत्सवा निमित्त सोमवार दि.०९ डिसेंबर रोजी जंगी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन....!


🌟या जंगी कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते होणार🌟


 
परभणी (दि.०७ डिसेंबर २०२४)  : परभणी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी आयोजिन श्री खंडोबा यात्रा महोत्सवाला आज शनिवार दि.०७ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे या खंडोबा यात्रा महोत्सवा निमित्त श्रीं च्या पालखीची भव्य मिरवणूक निघणार असून सोमवार दि.०९ डिसेंबर २०२४ रोजी जंंगी कुस्त्यांची दंगलही आयोजीत करण्यात आली आहे.

               श्री खंडोबा यात्रेनिमित्त आज शनिवार दि.०७ डिसेंबर रोजी सकाळी ०७.०० वाजता श्रींची महापुजा करण्यात आली यानंतर सायंकाळी श्रींच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले यात्रेनिमित्त सोमवार दि.०९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता मराठवाडा हायस्कूलच्या प्रांगणात जंगी कुस्त्यांची दंगल होणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते होणार असून यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून परभणी विधानसभेचे आमदार डॉ.राहुल पाटील यांच्यासह डॉ.विवेक नावंदर,जिल्हाप्रमुख विशाल कदम,गंगाप्रसाद आनेराव, अतुल सरोदे, नंदु आवचार, अरविंद देशमुख, अर्जुन सामाले, वसंत मुरकुटे, आप्पा बनसोडे, रमेश दळवी, सुनिल देशमुख, सुधीर पाटील, संजय सारणीकर, काशीनाथ काळबांडे, विनोद कदम, गणेश घाडगे, दिलीपराव आवचार, रामप्रसाद रणेर आदींची उपस्थिती राहणार आहे.

               या स्पर्धेत प्रथम क्रमांंकाचे पारितोषिक ०१ लाख ५१ हजार १०२ रूपये व चांदीची गदा,द्वितीय ५१ हजार १०१ रूपये व मानाचा फेटा,तृतीय ३१ हजार १०१ रूपये व मानाचा फेटा,चौथे पारितोषिक २१ हजार १०१ रूपये,पाचवे पारितोषिक ११ हजार १०१ ठेवण्यात आले आहे. दरम्यान,भाविक,क्रीडा प्रेमी जनतेने पालखी सोहळा,कुस्त्यांची दंगल कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक पहेलवान मारोतराव बनसोडे यांच्यासह आण्णा डिघोळे, विष्णु बनसोडे, रामजी तळेकर, गणेशराव मिरासे, एकनाथ आदींनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या