🌟पुर्णेतील निजामकालीन पुरातन वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिरींचे जतन करण्यात नगर परिषद अपयशी ?


🌟परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेल्या दुर्लक्षित अनेक विहिरी ठरताय नागरिकांसाठी डोकेदुखी🌟


 
पुर्णा (विशेष वृत्त - चौधरी दिनेश) :- पुर्णा शहरातील निजामकालीन पुरातन वास्तूंच्या रुपाने ओळखल्या जाणाऱ्या पुरातन व मानवी जिवनात उपयुक्त मुबलक प्रमाणात पाणीसाठा असलेल्या विहिरींचे जतन करण्यात पुर्णा नगर परिषद प्रशासनाला संपूर्णतः अपयश आल्याचे निदर्शनास येत असून शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या खाजगी व सार्वजनिक विहिरींच्या स्वच्छता व दुरुस्तीकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष दिल्यास परिसरातील नागरिकांना स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठा होऊ शकतो व भविष्यात पाण्याचा गंभीर प्रश्न देखील काही प्रमाणात सुटू शकतो परंतु शहरातील नागरिकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की नगर परिषद प्रशासनाने संपूर्णतः दुर्लक्षित केलेल्या या पुरातन विहिरी मानवी जीवनात उपयुक्त ठरण्याऐवजी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

पुर्णा शहरातील महावीर नगर (जैन जिनिंग),गवळी गल्ली (मारोती मंदिर लगत),लाल मिल,पोलिस स्थानक,मस्तानपुरा,पोलिस कर्मचारी वसाहत,राजे संभाजी नगर (मारोती मंदिर लगत),डोबी माता गल्ली,गवळ्याची देवी माता मंदिर,अंबानगरी (भवानी माता मंदिर परिसर),अशोक रोड (समता शाळा परिसर),आदी परिसरामध्ये वर्षाच्या बाराही महिने मुबलक पाणीसाठा असलेल्या पुरातन विहिरी होत्या या विहिरींच्या स्वच्छता व सुरक्षेकडे नगर परिषद प्रशासनाने संपूर्णतः दुर्लक्ष केल्याने यातील अनेक उघड्यावरील विहिरींचा वापर नागरिकांनी कचरा कुंड्यांप्रमाणे केल्याची दुर्दैवी बाब समोर आली असून काही विहिरी तर अक्षरशः 'सुसाईड पॉईंट' ठरत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे.

पुर्णा शहरातील महावीर नगर परिसरातील नर्सिंग बावडी म्हणून ओळखल्या जाणारी विहिर संपूर्ण शहरासह परिसरातील नागरिकांसाठी देखील वेळोवेळी धोक्याची घंटा देत असून या विहिरीत शहरातील अनेक नागरिक व महिलांनी देखील आत्महत्या करुन आपले जिवन संपवण्याच्या घटना घडल्या आहेत परंतू तरी देखील पुर्णा नगर परिषद प्रशासन या कायमस्वरूपी 'सुसाईड पॉईंट' ठरत असलेल्या नर्सिंग बावडीच्या स्वच्छता व सुरक्षेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे वर्षाच्या बाराही महिने पाण्याने तुडुंब भरलेल्या या विहिरीचा वापर या परिसरातील खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर कंपाऊंडर सफाई कामगार व परिसरात बेकायदेशीर चिकन मटन शॉप दुकानदार मानवी आरोग्यास हानिकारक असलेला जैविक कचरा तसेच परिसरातील नागरिक बिअर बार परमिटरुम हॉटेल खानावळ चालक आपापला घनकचरा या विहिरीत फेकत असल्याने या विहिरीत पडलेल्या व्यक्तीचा परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटुस्तर लागत नसल्याचे पाहावयास मिळत आहे असाच गंभीर प्रकार काल गुरुवार दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी उघडकीला आला या विहिरीत मागील अनेक दिवसांपासून अनोळखी इसमाचा मृतदेह पडला होता परंतु विहिरीतील साचलेल्या कचऱ्यामुळे या मृतदेहाची दुर्गंधी पसरल्यानंतर यांची जाणीव पोलिस प्रशासनासह परिसरातील नागरिकांना देखील झाली.

पुर्णा शहरातील अत्यंत उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महावीर नगर परिसरातील या 'नर्सिंग बावडीचा' गणपती/देवी विसर्जनासाठी देखील केला जातो परंतु या विहिरींची झालेली दुर्दैवी अवस्था लक्षात घेऊन यावर्षी नागरिकांनी विरोध केल्याने या विहिरीत गणपतीसह देवी विसर्जन करण्यात आले नाही नगर परिषद मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांनी या नर्सिंग बावडीसह शहरातील सर्वच पुरातन व मानवी जीवनात उपयुक्त असलेल्या विहिरींच्या स्वच्छता व सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या