🌟काही पुरुष लाडक्या बहिणीच्या नावे रक्कम लाटत आहेत. अशांची चौकशी केली जाणार - मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा करणार आहे. योजनेसाठी कोणतेही नवीन निकष लावण्यात आले नाहीत. मात्र, काहींनी तीन-चार खाती उघडली. काही पुरुष लाडक्या बहिणीच्या नावे रक्कम लाटत आहेत. अशांची चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, कोणीही कसलीही शंका मनात ठेवू नये. आम्ही जी आश्वासने दिली, ज्या योजना सुरू केल्या, त्यातील काहीही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवले, त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत. काहींनी चार-चार बँक खाती तयार करून फायदा घेतला आहे. समाजात जसे चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतात, तसे काही वाईट प्रवृत्तीचे असतात. अशा लोकांनी फायदा घेऊ नये, याची काळजी घेऊ. हा जनतेचा पैसा आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
0 टिप्पण्या