🌟याप्रसंगी बोलताना जिल्ह्याचे खासदार बंडु उर्फ संजय जाधव यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले🌟
परभणी : परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात उद्भवलेल्या तणावग्रस्त परिःस्थिती शांत करण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक घेतली.या प्रसंगी बोलतांना त्यांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना जिल्ह्याचे खासदार बंडु उर्फ संजय जाधव यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.पोलिसांनी घडलेल्या घटनेच्या रात्रीच योग्य बंदोबस्त तैनात करून आरोपीच्या पाठीशी असणाऱ्या शक्तींना अटक केली असती तर परभणी शहरात दगड फेकी सारख्या छुटपुट घटना घडल्याच नसत्या.असेही मत त्यांनी व्यक्त केले.ते असेही म्हणाले की,विजय वाकोडे,रवि सोनकांबळे,सुशील साळवे आणि त्यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करीत होते.त्यांची नावे आरोपिंच्या यादीत पाहून नवल वाटले.पोलीस प्रशासन जर अशा तऱ्हेने पोलिसांना सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच आरोपी करीत असेल तर यापुढे पोलिसांना कुणीही मदत करणार नाही.
याप्रसंगी रिपाईचे जेष्ठ नेते तथा आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे ,डॉ.सिध्दार्थ भालेराव,भीमराव हतिअंभिरे,रवि सोनकांबळे, ॲड.इम्तियाज,विजय वाकोडे, आदि मान्यवरांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निरपराध लोकांवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते त्वरित रद्द करावेत.कोंबिग ऑपरेशन करून लोकांत दहशतीचे वातावरण निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करू नये अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या.
या शांतता समितीच्या अध्यक्षपदावरून बोलतांना जिल्हाधिकारी गावडे यांनी कोणत्याही निरपराध व्यक्तीवर अन्याय होणार नाही शहानिशा करून निरपराध लोकांवर केलेले गुन्हे परत घेण्यासाठी पोलिसांना आदेश दिले या शांतता समितीच्या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे,निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा धालकरी, मनपा.आयुक्त,शहरातील प्रतिष्ठित नागरिक,प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी,कर्मचारी,विविध पक्षांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने शांतता समितीला उपस्थिती होती.....
0 टिप्पण्या