🌟परभणी हिंसाचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठीशी घातले - खा.राहुल गांधी
✍️ मोहन चौकेकर
💫सोमनाथ सूर्यवंशी दलित होता व तो संविधानाची रक्षा करत होता त्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप, राहुल गांधींनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची आणि जेष्ठ आंबेडकरवादी नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केलं सांत्वन ; परभणी हिंसाचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठीशी घातले असे म्हणत राहुल गांधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका ; बीड आणि परभणी प्रकरणात सभागृहाला खोटी माहिती दिली,काँग्रेस हक्कभंग प्रस्ताव आणणार,नाना पटोलेंची माहिती
⏰राष्ट्रवादीचे नाराज नेते छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटांची चर्चा ; आठ दिवस द्या, मार्ग काढू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिल्याचा छगन भुजबळांचा भेटीनंतर दावा
🪷हा आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय,तो आमचा आम्ही सोडवू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया ; छगन भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या एवढेच ओबीसी, त्यांच्या जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटेंची छगन भुजबळांवर टीका
💫उद्योग मंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी घेतली मस्साजोगच्या सरपंचांच्या कुटुंबीयांची भेट, हे लोण दुसरे कडे पसरु नये यासाठी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटांची यांचे वक्तव्य ; संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्त 9 जानेवारीला महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायती बंद, आखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय
💫सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अजित पवारांकडे मागणी ; धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा असं एकाही मराठा मंत्र्याने म्हटलं नाही, आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप, तर गुंडप्रवृत्तीच्या लोकांना मंत्रिपद, पालकमंत्रिपद नको, नरेंद्र पाटलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
💫मंत्रालयातील दालनानंतर हायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या बहाल, चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयलस्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा बंगल्याचे वाटप
💫प्रजासत्ताकदिनाला महाराष्ट्राचाही चित्ररथ असेल पण परेडऐवजी प्रदर्शनात असेल, चार वर्षे महाराष्ट्राला परेडमध्ये भाग घेण्याची संधी मिळाल्याचं स्पष्टीकरण
💫फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना मद्यधुंद डंपर चालकाने चिरडले, पुण्यातील धक्कादायक घटना ; पुणे अपघाताचा सीसीटीव्ही समोर ; अमरावतीमधून पुण्यामध्ये पोट भरण्यासाठी आलेल्या कामगारांनी आपल्या चिमुकल्या लेकरांना गमावलं
💫पंतप्रधान आवास योजनेतल्या जाचक अटी हटवणार, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गरीबांसाठी वर्षभरात 19 लाख 66 हजार घरे देणार, केंद्रीय ग्रामीणविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा
💫 पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, पूजा खेडकरने फक्त UPSCच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक केल्याचे कोर्टाचे ताशेरे
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या