🌟मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची महाराष्ट्र द्वेष्ट्या काँग्रेस आमदार मागणी....!


🌟काँग्रेस आमदार लक्ष्मण सवधीचे बेताल वक्तव्य करीत तोडले अकलेचे तारे🌟

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सिमेवरील बेळगाव येथे सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर कर्नाटकावर चर्चा होत असताना अथणी येथील महाराष्ट्र द्वेष्ट्या काँग्रेसच्या आमदारांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी करून आपल्या महामुर्खपणाणा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

बेळगावातील सुवर्ण विधानसभेत येथे कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाच्या उत्तरार्धात उत्तर कर्नाटकातील समस्या आणि विकासावर चर्चा सुरू आहे. त्यानुसार सभागृहामध्ये चर्चेला प्रारंभ झाल्यानंतर अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेते बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी करत असतील तर आपण देखील मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे असे वक्तव्य करून आपल्या अकलेच्या तारे तोडले. आमदार सवदी म्हणाले परवा महाराष्ट्रातील बुद्धिभ्रष्ट झालेल्या एका नेत्याने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा असे वक्तव्य केले. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावून प्रश्न विचारला असता संबंधित नेत्याची मती भ्रष्ट झाल्याचे मी स्पष्टपणे सांगितले. या पद्धतीने जर कर्नाटकाचा अविभाज्य अंग असलेला बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करायचा असेल तर मुंबई देखील केंद्रशासित करावी अशी मागणी आपण केली पाहिजे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या