🌟न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट देण्याची शक्यता🌟
मुंबई :- लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी दि. २३ डिसेंबर रोजी परभणी दौऱ्यावर येणार असून खा.राहुल गांधी यावेळी परभणी दंगल प्रकरणात न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्याची शक्यता आहे.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यावरुन दि.१० डिसेंबर २०२४ रोजी परभणीत दंगल उसळली होती यानंतर पोलीसांनी अटक सत्र राबवले. याप्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांनाही अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला. सध्या हे प्रकरण राज्यात आणि देशात गाजत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. शरद पवार यांनी परभणी दौरा केला. संसदेत देखील या प्रकरणी चर्चा झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी २३ डिसेंबर रोजी परभणीत येणार आहेत २३ तारखेला सकाळी ११ वाजता राहुल गांधी दिल्लीहून विशेष विमानाने नांदेड पोहोचतील. त्यानंतर १.१५ वाजता ते गाडीने नांदेडहून परभणीला जातील. २.४५ च्या सुमारास राहुल गांधी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची शोक भेट घेतील. यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होतील. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत परभणीतून राहुल गांधी काय होणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे......
0 टिप्पण्या