🌟पुर्णा तालुका सकल मराठा समाजाने केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी काढला जनआक्रोश मोर्चा...!


🌟सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मारेकऱ्यांनसह घटनेतील मुख्य सूत्रधारास अटक करण्याची मागणी🌟 

पुर्णा (दि.२६ डिसेंबर २०२४) :- बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणातील मारेकऱ्यांसह घटनेच्या मुख्य सूत्रधारास तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज गुरुवार दि.२६ डिसेंबर रोजी पुर्णा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

पुर्णा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज गुरुवारी सकाळी ११.०० वाजता शहरातील झिरो टी पॉईंट ते शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंत जनआक्रोश आंदोलन मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवाच्या उपस्थितीत हा मोर्चा पार पडला यावेळी निवेदनकर्त्यांनी मस्साजोग प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा,संतोषचे मारेकरी यांना अटक करा घोषणा देत मोर्चेकर्‍यांनी परिसर दणाणून सोडला घोषणा देत काळ्याफिती लावून निषेध व्यक्त केला. त्यानंतर प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना निवेदन दिले यावेळी पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे हेही उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णा पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पुर्णा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा शांततेत पार पडला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या