🌟परभणी येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आज थाटात उदघाटन ; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....!


🌟यावेळी जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे,जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची उपस्थिती🌟 


परभणी (दि.०५ डिसेंबर २०२४) : परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन बी.रघुनाथ सभागृह परभणी येथे उत्साहात संपन्न झाले जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सांस्कृतिक स्पर्धा अंतर्गत समूह लोकनृत्य व लोकगीत, कौशल्य विकास स्पर्धा अंतर्गत चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा कविता वाचन, कथालेखन, मोबाईल फोटोग्राफी तर संकल्पना आधारित स्पर्धेमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नव संकल्पना, इत्यादी विविध प्रकारात स्पर्धा संपन्न झाली.


या प्रसंगी  जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, नेहरू युवा केंद्राचे शशांक राउला, राज्य युवा पुरस्कारार्थी काजल भुसारे आदी उपस्थित होते.महोत्सवाचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी सहभागी युवांना प्रोत्साहन देऊन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सोबतच युवकांनी या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा. मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न जिल्ह्यात केला गेला आहे. युवकांनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा त्याचे होणारे चांगले वाईट परिणाम याबाबतचे माहिती युवकांना दिली. तसेच हे कार्यक्रम तालुका स्तरावर राबविले पाहिजे, जेणेकरून युवकांमध्ये आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, असे सांगितले. 

प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केले. देशाचं युवा धोरण पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याने तयार केले. युवा धोरण ठरवणारे आपले राज्य प्रथम याचा सार्थ अभिमान वाटतो. युवा महोत्सवाच्या निमित्ताने  अनेक कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळते. सांस्कृतिक कौशल्य विकास संकल्पना आधारित सायन्स क्षेत्रातील नाव, संकल्पना यामध्ये 15 ते 29 वर्ष वयोगटातील मुलांना या ठिकाणी सहभाग नोंदवता येतो. राज्यामध्ये सर्व जिल्ह्यात उत्साहाने हा महोत्सव साजरा केला जातो नेहरू युवा केंद्राचे जिल्हाप्रमुख शशांक राउला यांनी युवकांसाठी या स्पर्धेमार्फत युवकांमध्ये देशप्रेम जागृत होते असे व्यासपीठ सतत युवकांना मिळावे, असा संदेश दिला.

कार्यक्रमास परीक्षक प्रा.डॉ. आनंद मनोहर, प्रा.डॉ. भीमराव खाडे, प्रा.डॉ. सुरेश शेळके, प्रा.डॉ. सुरेश शेवाळे, डॉ. पंकज खेडकर, डॉ. मिलिंद बामणीकर, रवी पंडित, लक्ष्मी लहाने, समीर सौदागर हे उपस्थित होते.या स्पर्धे अंतर्गत विविध स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. सूत्रसंचालन हे श्रीकांत लासुरकर व वैष्णवी शर्मा यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील रोहन दांडेकर, सुरेश नाटकर, प्रकाश पंडित, धीरज नाईकवाडे व नेहरू युवा केंद्र मार्फत गौतम ढगे कार्यालयातील इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले......

*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या