🌟यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले🌟
फुलचंद भगत
वाशिम :- मालेगाव तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी 16 डिसेंबर रस्ता रोको अंदोलन करण्यात आले. त्यामध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व जनता या आंदोलनात सहभागी झाली होती.
परभणी महाराष्ट्र येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील राज्यघटनेच्या प्रतिकाचे प्रतीचा अपमान करण्या विरुद्ध कारवाही करण्यासाठी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले ते वापस घ्या. या आंदोलनात शहीद झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलिसांच्या ताब्यात असताना झालेल्या मृत्यू ची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे.
परभणी मध्ये जो प्रकार घडला त्यात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता यांच्यावर प्रशासनांनी खोटे गुन्हे लादले ते चुकीचे असून. ज्या व्यक्तीने हा अपमान केला त्यांच्या विरुद्धात निदर्शन करणे आमचा सविधानिक अधिकार असून या अधिकाराने लोक रस्त्यावर आले. परंतु प्रशासनाने याच चळवळीतील लोकांवर गुन्हे दाखल केले. ते मागे घेण्या करिता आणि या आंदोलनात शहीद झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलिसांच्या ताब्यात असताना झालेल्या मृत्यू ची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली. आंबेडकरी चळवळीतील लोक रास्तारोको आंदोलन करण्यात आले,दिनाक 16 डिसेंबर 2024 रोजी शेलू फाटा मालेगाव या ठिकाणी रास्तारोको आंदोलन करून निषेध नोंदविला आहे. या आंदोलनात जेष्ठ कार्यकर्ते गोवर्धन चौथमल, संदीप सावळे,चेतन इंगळे, अमोल पखाले, जनार्दन शिंदे,अजाबराव सदार,गोविंद वैद्य,विशाल पखाले, सुजित पखाले, सारनाथ अवचार,राजदीप पखाले, अनिल पखाले, नितीन पखाले,निखिल तेलगोटे,अनिल खडसे, तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या च्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी मालेगाव पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून निषेध व्यक्त केला. या रास्ता रोको आंदोलनाचे दरम्यान एक रूग्ण वाहीका आली असता आंदोलन कर्त्यांनी तीला रस्ता मोकळा करून वाशीम कडे जाऊ दिले. काहीवेळा नंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.......
0 टिप्पण्या