🌟परभणीतील उद्यानविद्या महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राष्ट्रीय कृषी शिक्षण दिन उत्साहात साजरा...!


🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनामाकृविचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ.बी.व्ही.आसेवर यांची उपस्थिती🌟 


परभणी :- परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इंद्रमनी यांच्या मार्गदर्शना खाली व कुलसचिव श्री संतोष वेनिकर यांच्या सूचनांप्रमाणे दि.03 डिसेंबर 2024 रोजी उद्यानविद्या महाविद्यालयांमध्ये कृषी शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय कृषी संशोधन परिषद (दिल्ली) ने या दिवसाची सुरुवात स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती व केंद्रीय कृषिमंत्री डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या कृषीतील योगदानाबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्त ०३ डिसेंबर हा कृषी शिक्षण दिन म्हणून  साजरा करण्याचे सूचना केलेला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी वनामाकृवि चे  संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. बी. व्ही.आसेवर तर प्रमुख अतिथी म्हणून वनामाकृवि चे संचालक- विस्तार शिक्षण डॉ. जी. एम.वाघमारे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कक्ष अधिकारी उच्च शिक्षण विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन श्री रामदास धुमाळ व पो स्टे कोतवाली चे पोलिस निरीक्षक श्री दिपक दंतुलवार यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.व्ही.एस.खंदारे यांनी मांडली प्रमुख अतिथी भाषणामध्ये डॉ. जी. एम. वाघमारे यांनी कृषी शिक्षणाचे महत्त्व व आज भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचे किती महत्त्व आहे तसेच आज सर्वच गोष्टींमध्ये कृषीचा वाटा हा कृषी शिक्षणापासूनच मिळतो याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.तसेच श्री रामदास धुमाळ यांनी कृषीचे शिक्षण घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरून महाराष्ट्र व भारत सरकारच्या कृषी खात्यातील पदांवर कसा पोहोचू शकतो, आणि पदवीच्या चार वर्षांमध्ये घेतलेल्या ज्ञानाचा साठा एक विद्यार्थी मिळालेल्या पदावर कसा विकसित करु शकतो याबाबत सखोल मार्गदर्शन केले. 

त्याचप्रमाणे श्री दीपक दंतुलवार यांनी कृषी विभागाचे शिक्षण घेऊन भविष्यात कोठेही कोणत्याही पदावर गेलो तरीही आपण घेतलेल्या शिक्षणा सोबतची नाळ कशी जुळवून ठेवली पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले, इतर पदवीमध्ये शिक्षण घेण्यापेक्षा कृषी शिक्षणामध्ये पदवी घेतल्याने नोकरीच्या संधी जास्त उपलब्ध आहेत कारण आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे विद्यार्थ्यांनी कृषी शिक्षणामध्ये आपले ध्येय ओळखून यश मिळवावे आणि कृषी शिक्षणातून आपले उज्वल भविष्य घडवावे असे प्रतिपादन केले. 

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी,तसेच महाविद्यालयाचे सर्व सहयोगी व सहायक प्राध्यापक डॉ. बी.एम. कलालबंडी, डॉ.भोसले, डॉ.व्ही.व्ही.भगत, डॉ.ए.एस.लोहकरे, डॉ. एस. आर. वानखेडे डॉ. एस.बी.पव्हणे, डॉ. एस. जी. खंडागळे, ज्योती कळंबे डॉ. पालेपाड तसेच कर्मचारी एस. सी. पठाण, सतीश पुंड,श्री मुकाडे,श्री देशमुख यांनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पुंड तर आभार प्रदर्शन कृष्णा भोईते यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या