🌟ऑईल इंडस्ट्रीजला लागलेल्या भीषण आगीत पाच जण गंभीर जखमी🌟
नांदेड : नांदेड शहरालगत असलेल्या सिडको औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) परिसरातील तिरुमल्ला ऑइल इंडस्ट्रीज कंपनीला आज रविवार दि.०१ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास भिषण आग लागल्याची घटना घडली. या आग लागली यावेळी कंपनीत काही कामगार काम करीत होते. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत.
नांदेड शहरापासून जवळ असलेल्या सिडको एमआयडीसी परिसरातील तिरुमला ऑइल कंपनीला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली सकाळीच कंपनीत कामाला कामगार दाखल झाले होते याच वेळी अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला यामुळे पळापळ सुरु झाली. आगीबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. मात्र गाडी येईपर्यंत आग अधिक प्रमाणात पसरली होती.....
0 टिप्पण्या