🌟स्वस्त धान्य दुकानात धान्य पोहोचले की तात्काळ मेसेज जाणार आणि धान्य भरल्यानंतरही एक मेसेज पोहचणार आहे🌟
नागपूर :- राज्यातील शिधापत्रिका धारकांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे शासकीय स्वस्त धान्य शिधापत्रिका धारकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि अत्यंत महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. खरंतर राज्यभरातील अनेक शासकीय स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणाऱ्या धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. दरम्यान सर्वसामान्य गरजवंत नागरिकांसाठी उपलब्ध होणाऱ्या याच धान्याची काळाबाजार ही रोखण्यासाठी पुरवठा विभागाच्या माध्यमातून ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी एसएमएस गेटवे हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या नव्या प्रणालीमुळे आता शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानात धान्य पोहोचले की लगेचच मेसेज जाणार आणि त्यांनी धान्य भरल्यानंतरही एक मेसेज पोहचणार आहे....
0 टिप्पण्या