🌟महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाची मागणी🌟
हिंगोली,(राज्यस्तरीय वृत्त विशेष) हातकणंगले विधान सभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार , शासनाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थी सहकारसूर्य आ.अशोक माने,सलग तिसऱ्यांदा हिंगोली विधानसभा चे भाजपा नेते आ.तानाजीराव मुटकुळे,आ.विनय कोरे, ह्यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाची आहे.आ.अशोक माने,आ. मुटकुळे,आ.कोरे ह्यांनी आजीवन समाजकल्याण सेवाकार्य केले असून सामाजिक न्याय क्षेत्रातील त्यांनी केलेल्या सेवा मुळे त्यांचा विजय झाला आहे. हे तिन्ही आमदार दीन दूबल्यांचे कैवारी असल्याने विजयी झाले आहे अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाचे राज्यकार्याध्यक्ष समाजभूषण, ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी दिली.सहकार,राजकीय,सामाजिक,आर्थिक, औद्योगिक,लोककल्याणकारी क्षेत्रातील राज्यातील एक अग्रगण्य,अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून समाजभूषण आ.अशोक माने ह्यांची ख्याती असून ते आमच्या संघाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक सल्लागार आहेत.
त्यांची वर्णी सामाजिक न्याय मंत्रीपदी लावून एका मागासवर्गीय समाजसेवकास मंत्रिपद दिल्यास न्यायोचित होईल असंही राज्यसंघाचे कार्याध्यक्ष समाजभूषण डॉ.विजय नीलावार ह्यांनी म्हंटल आहे.आजवर त्या, त्या काळातील आमदार, खासदार, मंत्री महोदय, ह्यांच्या मार्फत व संघाने थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांना समक्ष भेटून व अधिवेशने घेवून समाजभूषण पुरस्कारार्थिंच्या न्याय मागण्या केल्या असून जाहीर आश्वासन शिवाय संघाच्या पदरी मागील २० वर्षात काहीच आले नाही अशी खंत संघाने व्यक्त केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री ना. एकनाथ भाई शिंदे ह्यांना हिंगोलीचे सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार भाजपा नेते आ.तानाजीराव मुटकुळे ह्यांनी भेटून दलीत मित्रांच्या न्याय मागण्या मंजूर करा अस साकडं २८ जून २०२४ ला घातल होत.ना.शिंदे साहेबांनी सामाजिक न्याय सचिवाना मागण्यावर आधारित प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आदेश दिले होते, त्यास ही ६महिने झाले असता अजूनही काही प्रगती झाली नाही ही शोकांतिका आहे .संघाच्या निवेदनात नमूद बाबीत स्वातंत्र्यसैनिकां प्रमाणे पुरस्कारार्थीना प्रतिमाह मानधन व सर्व सुविधा देण्यात याव्यात,सर्व शासकीय, राष्ट्रीय,लोककल्याणकारी उपक्रमास निमंत्रित करण्यात यावे, एस.टी.च्या ताफ्यातील साधी,आराम, निमआराम, बस मधून एका साथीदारासह किलोमिटर मर्यादा न लादता सुरू असलेली मोफत पूर्वापार सवलत आता एस.टी.च्या सर्व प्रकारच्या बसेस मधून परिपत्रक सुधारून राज्यातील एसटी राज्या बाहेर जिथवर जाते तिथवर दोन आरक्षणा सह देय करावी, पुरस्कारार्थिना एस.टी. ने दिलेल्या पासेस नूतनीकरण विभागीय पातळीवर प्रत्यक्षात जावून करवून घेण्या ऐवजी आगार पातळीवर प्रतिवर्षी करून द्यावे, राज्यातील शासकीय,निमशासकीय धर्मादाय व सुपर स्पेशियालिटी तसेच खासगी नामांकित रुग्णालयातून दलीतमित्र व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य आणि केंद्र शासनाच्या असलेल्या सर्व आरोग्य सुविधा मोफत देण्यासाठी स्वतंत्र ओळखपत्र द्यावे, पुरस्कारार्थिना स्वातंत्र्यसेनानी प्रमाणेच एका साथीदारासह रेल्वे प्रवास सवलत मिळवून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून शासनाने सुविधा देय करून द्यावी,राज्य आणि केंद्र शासनाच्या सर्व राष्ट्रीय व लोककल्याणकारी, सेवा कार्याची उद्दिष्ट्य पूर्ती करण्यासाठी दलितमित्राना तालुका ते राज्य पातळीवर विविध विभागांच्या अशासकीय सदस्यपदि नियुक्ती करावी, पुरस्कारार्थिना देय असलेल्या सा.बा.विभागाच्या विश्राम गृहाची सुविधा देण्या बाबत परिपत्रक असताना देखील विभागा कडून अक्षम्य टाळाटाळ करून विश्रामगृह उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते त्याबाबत सा.बा.विभागास प्राधान्याने देय सुविधा देण्यासाठी आदेशित करावे व सुविधा का नाकारण्यात आली त्याचा खुलासा देण्यास संबंधी विभागास आदेश देण्यात यावेत,दरवर्षी शासना कडून निवड झालेल्यांना पुरस्कार वितरण करावे व महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाच्या राज्य स्तरीय अधिवेशन साठी किमान १५ लाख रू.अनुदान द्यावे,आदी मागण्या आहेत.मागील २० वर्षाच्या कालखंडातील अनेक मुख्यमंत्री,उपमुख्य मंत्री,सामाजिक न्याय मंत्री आदींनी केलेल्या घोषणा, संघा सोबतच्या मंत्रालयातील संबंधित मंत्री महोदय व उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं समवेत झालेल्या संघाच्या बैठका, ह्या केवळ शोभेच्या ठरल्या. महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी व विद्यमान सल्लागार नवनिर्वाचित आमदार समाजभूषण अशोकराव माने, आ.तानाजीराव मुटकुळे आ .विनय कोरे ह्यांच्या माध्यमातून संघाच्या मागण्यांची फलश्रुती होईल अशी अपेक्षा आहे.ह्या तीन्ही आमदारांचां सत्कार संघाच्या नागपूर जिल्हा शाखेने नागपूर येथे मोर भवनला १७ डिसेंबरला दुपारी २ वाजता जिल्हा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे च्या अध्यक्षतेखाली आयोजीला आहे अशी माहिती सचिव प्रकाश कुंभे ह्यांनी दिली आहे.आज घडीला मात्र समाजभूषण पुरस्कार्थींच्या न्याय मागण्या कडे दुर्लक्ष केल्याने राज्यात प्रचंड नाराजी पसरली आहे.तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आणि संबंधित मंत्र्यांच्या आदेशाचे पालन कधी होणार व कधी न्याय मिळणार अस संघाचे राज्यअध्यक्ष योगेश वागदे,राज्य कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार,सरचिटणीस भूषण दडवे,कोषाध्यक्ष वृषाली वाघचौरे,राज्य संघटक हरिश्चंद्र माने गुरुजी,व संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी म्हंटले आहे.मागील २० वर्षा पासून अनेक शासनकर्त्या मंडळींनी आदेश देवून जाहीर घोषणा करून ही फलश्रुती झाली नाही त्यामुळे पुरस्स्कारार्थिना कधी न्याय मिळेल ह्याची प्रतीक्षा महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघ करीत आहे....
0 टिप्पण्या