🌟धम्माश्रय युवा विचार मंचच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर....!


🌟नांदेड येथील श्रीनगर रोड येथील पंचशील ड्रेसेस जवळ दि.०६ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन🌟


 
नांदेड (दि.०४ डिसेंबर २०२४) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड येथील धम्माश्रय युवा विचार मंचच्या वतीने शुक्रवार दि.०६ डिसेंबर रोजी पंचशील ड्रेसेस जवळ श्रीनगर रोड येथे सकाळी १०.०० वाजता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून धम्माश्रय युवा विचार मंच व प्रभात नगर,लुंबिनी नगर,कुशी नगर,श्रीनगर परिसरातील मित्र मंडळांच्या वतीने मागील १७ वर्षांपासून प्रतिवर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करुन महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येते याहीवर्षी दि.०६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी धम्माश्रय युवा विचार मंचासह नमूद मित्र मंडळांकडून भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले असून या रक्तदान शिबिरात तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवून महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आवाहन धम्माश्रय युवा विचार मंचाकडून करण्यात आले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या