🌟काही लोकांचे वेगळे षड्यंत्र होते का ? पोलिसांकडून यांचा देखील तपास सुरू🌟
परभणी : परभणी शहरांतील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील प्रतिकात्मक संविधाना प्रतिकृतीच्या विटंबना केल्यानंतर काल बुधवार दि.११ डिसेंबर रोजी आंबेडकरवादी संघटनांकडून घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागून शहरातील विविध भागात जाळपोळ दगडफेक तोडफोडीच्या भयंकर घटना घडल्या तत्पूर्वी परभणी पोलिस दलाने संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटने संदर्भात विटंबना करणाऱ्या विकृतबुधदीमत्तेच्या समाजकंटकाला संतप्त जमावाने ताब्यात घेऊन चोप दिल्यानंतर घटनास्पोथळावरुन त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर रितसर गुन्हा दाखल केला होता या संदर्भात पोलिस प्रशासन पुढील तपास देखील करीत होते परंतु मंगळवार दि.१० डिसेंबर २०२४ रोजी आंबेडकरवादी संघटनांनी एकत्रित येवून शांततेत बंद करणार असल्याचं प्रशासनाला आश्वासन दिल परंतु दुर्दैवाने काल बुधवार दि.११ डिसेंबर २०२४ रोजी आंदोलनाला हिंसक वळण लागले व शहरासह आसपासच्या परिसरात भयंकर दगडफेक तोडफोड जाळपोळीच्या घटना घडून शासकीय मालमत्तेसह खाजगी मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले या हिंसाचाराच्या आगडोंबानंतर काल बुधवारी दुपारी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी तात्काळ परभणीत दाखल होऊन परभणी जिल्हा पोलिस दलाला कठोर कारवाई करण्याचे आदेश देऊन स्वतः शहरातील हिंसाचारात होरपळलेल्या घटनास्थळांना भेटी देऊन पाहणी केली यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हिंसाचार घडवणाऱ्यां विरोधात कठोर कारवाईचे संकेत दिल्याने शहरातील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४० जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे व पोलिस नियमानुसार कारवाई करणार असल्याचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले परभणी शहरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरात प्रचंड तणावासह दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या आदेशान्वये शहरात जमाबबंदीचे आदेश जारी करण्यात आले तर राज्य राखीव दलाच्या दोन अतिरिक्त तुकड्याही तैनात करण्यात आल्या विशेष पोलिस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप वेळीच परभणीत दाखल होऊन त्यांनी हिंसाचार प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश परभणी जिल्हा पोलिस दलाला दिले नसते तर कदाचित परभणी शहर संपूर्ण उध्वस्त झाले असते असे परभणी शहरातील सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
परभणी शहरात काल बुधवारी झालेल्या आंदोलनावेळी शहरातील विविध भागांमध्ये हिंसक आंदोलकांनी दुचाकी चारचाकी वाहनांसह एसटी महामंडळाच्या अनेक बसेसची तोडफोड केली सार्वजनिक रस्त्यांवर टायर जाळून विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन देखील करण्यात आले परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रांसह फर्निचर खुर्त्यांची फेकाफेक तोडफोड देखील केल्याच्या घटना घडल्या या भयंकर घटनांमुळे दुपारनंतर पोलिस दलाकडून बळाचा वापर करण्यात आला. याप्रकरणी, घटनेसाठी जबाबदार असलेल्या ४० लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शहाजी उमाप यांनी दिली. परभणी शहरात सध्या जमाबंदी आहे मात्र, कोणतीही संचारबंदी नाही, परिस्थिती हाताळण्यासाठी संचार बंदीची आवश्यकता वाटत नाही असेही उमाप यांनी स्पष्ट केले शहरातील संवेदनशील भागांमध्ये राज्य राखीव दलाचा वापर करणार असल्याचेही श्री शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले.
💫काही लोकांचे वेगळे षड्यंत्र होते का ? पोलिसांकडून यांचा देखील तपास सुरू :-
आजच्या आंदोलनात १६-१७ मोटरसायकलीचे नुकसान झाले आणि २ फोर व्हीलर गाड्यांचे नुकसान झाले आहे. ज्या लोकांनी हे कृत्य केली त्याचे चित्रीकरण आमच्याकडे उपलब्ध असून त्यांच्यावर कारवाई करणार, असल्याचे उमाप यांनी म्हटले. काल सर्वांनी एकत्रित बसून ठरले असताना आज शांततेत निवेदन देणं अपेक्षित होतं. तरी देखील काही लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रकार केले. त्यावरून या ठिकाणी काही लोकांचे वेगळे प्लॅनिंग होतं का? या दृष्टीने तपास करत आहोत. जे जे लोक जबाबदार असतील त्या सर्वांना पोलीस अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही उमाप यांनी स्पष्ट केले. दरम्यान, परभणी शहरात ठीक ठिकाणी फिक्स पॉईंट लावलेले आहेत. सध्या सर्वत्र शांतता आहे...
0 टिप्पण्या