🌟परभणीतील ‘जिजाऊ ज्ञानतीर्थ’ मध्ये शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.....!


🌟या वक्तृत्व स्पर्धेत्व सहभागी व्हावे असे आवाहन जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेचे सचिव मुख्याध्यापक प्रा.नितीन लोहट यांनी केले🌟

परभणी (दि.०९ डिसेंबर २०२४) : जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामराव लोहट यांच्या वाढदिवसानिमित्त याहीवर्षी मानवत रोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ प्राथमिक माध्यमिक व छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवार १३ डिसेंबर रोजी ‘रामराव लोहट जिल्हास्तरीय वक्तृत्व’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

              स्पर्धेचे हे १० वे वर्ष आहे. ही स्पर्धा दोन गटात होणार असून स्पर्धेचे विषय -गट अ -(इयत्ता ५ वी ते ७ वी) ‘ऑनलाईन शिक्षण - फायदे व तोटे’,  ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपले भविष्य’,  ‘सायबर सुरक्षा आणि किशोरवयीन मुलांचे संरक्षण’ हे आहेत. तसेच गट-ब इयत्ता ८ वी ते १० वी साठी  ‘भारतीय संविधान मानवतावादी धर्मग्रंथ’, ‘जागतिक शिक्षण व्यवस्था व भारत’, ‘वाढती लोकसंख्या व भारत देशासमोरील आव्हाने’ हे विषय असणार आहेत. या दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी प्रथम - २५०१ रुपये,द्वितीय २००१ रुपये,तृतीय-१५०१ रुपये,उत्तेजनार्थ ७०१ रुपये,५०१ रुपयें, ३०१ रुपये अशी रोख पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येतील.

            दरम्यान, जास्तीत जास्त स्पर्धकांनी या वक्तृत्व स्पर्धेत्व सहभागी व्हावे, असे आवाहन जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक प्रा. नितीन लोहट यांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या