🌟दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला डॉ.मनमोहन सिंघ यांनी अखेरचा श्वास🌟
✍️ मोहन चौकेकर
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंघ यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज (२६ डिसेंबर) त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्यत मालवली. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त एम्स रुग्णालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.मनमोहन सिंघ यांना रात्री ८ वाजता आपत्कालीन परिस्थिती दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
मनमोहन सिंघ ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ साली डॉ. मनमोहन सिंघ यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली.
💫पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली :-
“भारताने आपले सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंघ यांना गमावलं आहे. नम्रपणा जोपसाणारे मनमोहन सिंघ सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी विविध सरकारी पदांवर तसेच अर्थमंत्री म्हणून काम केले आणि गेल्या काही वर्षांत आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
💫प्रियांका गांधी यांनीही व्यक्त केल्या भावना :-
राजकारणात फार कमी लोकांनी सरदार मनमोहन सिंघ यांच्याप्रमाणे आदर मिळतो. त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते कायम उभे राहतील. विरोधकांच्या अन्यायकारक आणि गंभीर वैयक्तिक हल्ल्यांना बळी पडूनही राष्ट्रसेवेच्या आपल्या वचनबद्धतेत ते स्थिर राहिले. ते खऱ्या अर्थाने समतावादी, हुशार, प्रबळ इच्छाशक्ती आणि शेवटपर्यंत धैर्यवान होते. राजकारणाच्या खडबडीत जगातला एक अनोखा प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस असे मनमोहन सिंघ होते.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या