🌟संविधान गौरव सोहळ्याचे मुख्य संयोजक तथा जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांचे प्रतिपादन🌟
पर्णा : देशात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सुरू आहे.त्यानिमित्ताने केंद्र आणि राज्य सरकारने देशभर घर घर संविधान हा कार्यक्रम राबवावा.देशातील सर्व नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी देशातील प्रत्येक कुटुंबात एक संविधानाची प्रत द्यावी.असा ठराव संविधान गौरव समितीचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे यांनी मांडला.त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सम्मती दर्शविली. तातडीने ह्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी देशाचे पंतप्रधान,राष्ट्रपती,सामाजिक न्याय मंत्री आणि राज्यातील मुख्यमंत्री,सामाजिक न्याय मंत्री आणि संबंधितांना पाठविण्यात येणार आहेत २३ सा व्या संविधान गौरव सोहळ्याच्या तयारीच्या निमित्ताने पूर्णा नगर पालिकेच्या सभागृहात संविधान गौरव समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते उत्तम खंदारे हे होते.
या बैठकीचे प्रास्ताविक प्रा.अशोक कांबळे यांनी केले.तर ॲड.हर्षवर्धन गायकवाड,अनिल खर्गखराटे,चक्रवर्ती वाघमारे,श्रीकांत हिवाळे,अब्दुल मुजीब अब्दुल हबीब,आतीक, कॉम.अशोक कांबळे ,विनोद गायकवाड,तुषार गायकवाड,रौफ कुरेशी, आदि मान्यवरांनी आपली मनोगते मांडली.ज्यात प्रामुख्याने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला.मराठवाड्यात बीड,परभणी येथील घटनांवर चिंता व्यक्त करून संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध राष्ट्र द्रोहाचे गुन्हे दाखल करावेत.तसेच संविधानाच्या रक्षणार्थ आणि समर्थनार्थ परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी आणि विजय वाकोडे शहीद झाले.त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत करावी. व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत कायम स्वरुपी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे.अशीही मागणी करण्यात आली.या बैठकीत परभणी येथे चालू असलेल्या धरणे आंदोलनास पाठिंबा देऊन त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.प्रजासत्ताक दिनी होऊ घातलेल्या २३ सा व्या संविधान गौरव सोहळ्यात आ.जितेंद्र आव्हाड,अंजली दमानिया,प्रा.सुकुमार कांबळे,भालचंद्र कांगो,नितीन बानगुडे,आदी संविधानपर प्रबोधन करणाऱ्या मान्यवरांना निमंत्रित करावे.असेही अनेक मान्यवरांनी सुचविले.
या बैठकीला माजी नगराध्यक्ष जाकिर कुरेशी,गौतम काळे,किशोर ढाकर्गे, ॲड.संदीप पठारे, ॲड.सिद्धांत गायकवाड, ॲड.किशन वावळे,श्यामसुंदर काळे,विजय जोंधळे,प्रवीण कनकुटे,मतीन हाश्मी,साहेबराव सोनवणे,गौतम मुळे,आनंद खाडे, ॲड.सिध्दार्थ खरे,मिलिंद सोनकांबळे,दादाराव आहिरे,रघुनाथ कांबळे,गंगाधर कांबळे,त्रिंबक कांबळे,कुंदन ठाकूर,गौतम येंगडे,अमृत मोरे,मोहन लोखंडे,अनिल आहीरे,विजय सोनुले,किशन ढगे,शिवाजी वेडे,नागेश नागठाणे,आदींसह मोठ्या संख्येने जनसमुदाची या बैठकीला उपस्थिती होती यावेळी बैठकीचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन शाहीर गौतम कांबळे यांनी केले......
0 टिप्पण्या