🌟नांदेड येथे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या दि.१० डिसेंबर रोजी भव्य आक्रोश मोर्चा....!

 


🌟या भव्य आक्रोश मोर्चाचे नेतृत्व अनेक साधुसंत करणार🌟

नांदेड (दि.०९ डिसेंबर २०२४) :- बांगलादेशत अल्पसंख्याक हिंदूंवर कट्टरपंथी धर्मांध बांगलादेशी मुस्लिमांकडून अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बांगलादेशची राजधानी ढाकात कट्टरपंथी धर्मांधांकडून हिंदूच्या धार्मिक स्थळांना देखील लक्ष बनवले जात आहे त्या  अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ उद्या मंगळवार दि.१० डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता नांदेड येथील सकल हिंदू धर्मियांच्या वतीने शहरातील  जुनामोंढा येथुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाचे नेतृत्व अनेक साधुसंत करणार आहेत. १० डिसेंबर हा जागतिक मानव अधिकार दिन आहे. तेंव्हा बांगलादेशातील हिंदूंनाही मानव म्हणून अधिकार मिळावेत व त्यांच्यावरील जिहादी अत्याचार थांबवावेत अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे. त्याचप्रमाणे मानव अधिकार हे फक्त काही विशिष्ट लोकांसाठी आहे का? असा सवालही सकल हिंदू समाजाने केला आहे. तरी तमाम हिंदूंनी उद्याच्या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाने केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या