🌟महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात सोळा तालुक्यांचा समावेश असलेला नांदेड जिल्हा उपेक्षित ?

 


🌟नांदेड जिल्ह्याच्या विकासा बद्दल आता चिंतन करावे की चिंता करावी : वरिष्ठ पत्रकार स.रविंद्रसिंघ 

नांदेड जिल्ह्याला मागील एक दशकापासून राज्य मंत्री मंडळात स्थान नाही. तसेच मागील दोन दशकापासून केंद्रीय मंत्री मंडळात देखील प्रतिनिधित्व नाही. काल नागपुर येथे पार पडलेल्या जम्बो मंत्रिमंडळात नांदेड जिल्ह्याला साधे राज्य मंत्रिपद देखील मिळाले नाही या वरून आश्चर्य निर्माण होते. तसेच जिल्ह्याचा राजकीय ग्राफ चढला की घसरला याचे चिंतन होणे आवश्यक ठरते. गुरुतागद्दी त्रिशताब्दी विकासामुळे देशभरात गाजलेला नांदेड जिल्हा नंतर राजकीयदृष्टया मागे कसा घसरला? आता जिल्ह्याच्या विकासा बद्दल चिंतन करावे की चिंता करावी ? 

नांदेड जिल्हा क्षेत्रफळाने खूप विस्तृत आणी दोन राज्यांच्या सीमेला स्पर्श करणारा तसेच सोळा तालुके व्याप्त ऐतहासिक व धार्मिक महत्व असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातून महायुतिला विधानसभेतून सर्वच नऊ आमदार मिळाले. अशा जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व न मिळणे हे राजकरण क्षेत्रातील सक्रिय नेत्यांचा अपयश तर नाही असा प्रश्न निर्माण होतो. नांदेडच्या तुलनेत आकाराने लहान आणी कमी तालुके असलेल्या मराठावाडा आणी विदर्भातील जिल्ह्यान्ना कैबिनेट आणी राज्य मंत्री पद देण्यात आली आहेत. त्या जिल्ह्यान्नचे नेतृत्व सिद्ध झाले. दूसरीकडे या द्वारे नांदेड जिल्ह्याला मिळालेली ही एका प्रकारची अस्वस्थताच आहेच. शिवाय एक शक्यता (संशय) निर्माण करणारी आहे की भविष्यात नांदेडला विकासात कोणते माप (जड) दिले जाणार आहे. यापुढे देखील जिल्ह्याला बाहेरूनच पालकमंत्री आयात करावा लागणार आहे. 

मागील दहा वर्षात केंद्र आणी राज्यात नांदेडच्या वाट्याला उपेक्षाच लाभलेली आहे. मागील लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात नांदेडला स्थान मिळेल अशी सर्वच नागरिकांना आशा होती. राज्यसभेत नांदेडचे दोन खासदार असतांना आणी पात्रता असतांना देखील त्यांना मंत्री पद दिले गेले नाही. केन्द्रात मंत्रीपद मिळाले नसतांना देखिल नांदेडच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतिला भरभरून मते दिली. जिल्ह्यातून नऊ आमदार उपलब्ध असतांना दुर्भाग्याने म्हणा मंत्री पदाचे समीकरण काही जुळून आले नाहीत. तीन किंवा चार टर्म असलेले आमदार वरिष्ठान्नच्या नजरेंत पडले नाहीत. आता पुढील पाच वर्षें जिल्ह्याला लाल दिवा नाहीच म्हणून जानतेला संयम बाळगावा लागेल ही मोठी राजकीय शोकांतिका म्हणावी लागेल......

प्रतिक्रियास.रविंद्रसिंघ मोदी वरिष्ठ पत्रकार,नांदेड

9420654574

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या