🌟या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.प्रशांत भोसले यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
पुर्णा :- पुर्णा शहरातील नगर परिषदेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात दि.१७ डिसेंबर ते दि.१९ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत बीज भांडवल प्राप्त लाभार्थ्यांसाठी परभणी कृषी विज्ञान केंद्र व नगर परिषद पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने बिज भांडवल प्राप्त लाभार्थ्यांसाठी एक दिवसीय तिन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र परभणी चे डॉ.प्रशांत भोसले, तसेच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन प्रशासकीय अधिकारी नगर परिषद, पूर्णा श्री. मुंतजीब, हे उपस्थीत होते. श्री. महेश मोरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, नगर परिषद, पूर्णा यांनी प्रमुख पाहुणे पद भुषविले होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सहाय्यक प्राध्यापक, अन्नतंत्र महाविद्यालय, वनामकृवि,डॉ. बी. एम. पाटील, परभणी हे लाभले होते. मुंतजीब यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजने विषयी सविस्तर माहिती दिली व या प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्याच प्रमाणे बचत गटातील महिलांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा व योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भोसले, यांनी बचत गटातील महिलांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेऊन मोठ्या संखेने प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचे आवाहन केले. तसेच बचत गटातील महिलांनी प्रक्रिया युक्त पदार्थांची पॅकेजींग, लेबलींग व ब्रँडिंग उत्तम प्रतीची करण्यावर भर द्यावा जेणे करुन त्यांना मार्केटींग मध्ये अडचण येणार नाही असे नमुद केले. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. महेश मोरे, यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजने विषयी सविस्तर माहिती दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमातील तांत्रिक सत्रामध्ये डॉ. बी. एम. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, अन्नतंत्र महाविद्यालय, वनामकृवि. परभणी यांनी प्रक्रियायुक्त पदार्थांचे पॅकेजींग, लेबलींग, ब्रँडिंग, विपणन व विक्री व्यवस्थापन या बाबी विषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रक्रिया उद्योग व्यवसायाच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर अनुपालन व अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाविषयी माहिती दिली.कार्यक्रम सहाय्यक, कृषि विज्ञान केंद्र, चंद्रशेखर देशमुख, यांनी सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्या विषयी संपुर्ण माहिती दिली. डॉ. अरुणा खरवडे यांनी उद्योजकता विकास कौशल्य या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, मूल्यवर्धन व विविध प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी लागणाऱ्या यंत्र सामग्री विषयी सखोल माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नगर परिषद पूर्णा या विभागाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या दहा बचत गटातील ९६ महिलांनी सहभाग नोंदवला होता.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सौ. पुष्पा कानडे, समुदाय संघटक, नगर परिषद, पुर्णा व कृषी विज्ञान केंद्र परभणी येथील डॉ. अरुणा खरवडे, शास्त्रज्ञ गृह विज्ञान यांनी केले......
0 टिप्पण्या