🌟नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयास सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुभाष राठोड यांची जागतिक दिव्यांग दिना निमित्त भेट...!

🌟पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झालेले दिव्यांग सूर्यभान कागणे यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन केला सन्मान🌟


नांदेड (दि.०३ डिसेंबर २०२४) - महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावत सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री सुभाष राठोड यांनी आज मंगळवार दि.०३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदावर नुकतीच निवड झालेले व रस्ते अपघातात आपले दोन्ही पाय गमावलेले व जन संपर्क कार्यालयात कार्यरत धाडसी दिव्यांग पोलिस अधिकारी श्री सूर्यभान कागणे यांना भेट देऊन त्यांना भावी निरोगी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्या देत त्यांचा सन्मान केला.


यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वानखेडे,हेडकॉन्स्टेबल पेदेवाड,हेडकॉन्स्टेबल संजय सांगवीकर,पोलिस कर्मचारी मारोती कांबळे यांची देखील उपस्थिती होती जन संपर्क कार्यालयात कार्यरत धाडसी दिव्यांग पोलिस अधिकारी श्री सूर्यभान कागणे हे दि.३० सप्टेंबर २००५ रोजी भोकर फाटा येथे महामार्ग पथकात कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या मोटार सायकल वर जात असताना सतत पडलेल्या पाऊसामुळे मोटारसायकल खड्यात पडल्याने ते रोडवर पडून ट्रक खाली आल्याने त्यांचे दोन्ही पाय टायर खाली गेल्याने सूर्यभान कागने यांच्या दोन्ही पायाचा चुरा झाला होता.

अशा कठीण यातना भोगून,शोषून देखील धाडसी पोलिस उपनिरीक्षक कागने आज देखील महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत राहून आपले कर्त्यव्य इमानेइतबारे बजावत जनतेला सेवा देत आहे त्यांच्या कार्यकतृत्वाला सलामी देण्यासाठी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा नांदेड जिल्हा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संघटक श्री सुभाष राठोड यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या