🌟पुर्णेत गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यासह परभणी प्रकरणांचा डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने केला निषेध...!


🌟मयत भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ०१ कोटी रुपयांची मदत करण्याची मागणी🌟 

पुर्णा :- पुर्णा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आज रविवार दि.२२ डिसेंबर रोजी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेकडून गृहमंत्री अमित शाह यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा आणि परभणीत मनुवादी वृत्तीने केलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यचा व मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व्यक्त केला. तसेच डी वाय एफ आय या संघटनेनी अमित शहा यांनी माफी मागत आपला राजीनामा द्यावा अशी मागणी केली. याशिवाय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ०१ कोटी रुपयांची मदत करावी अशी ही मागणी केली. 


   यावेळी डी वाय एफ आय चे राज्य सहसचिव तथा जिल्हा सचिव नसीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष अमन जोंधळे, जिल्हा कोषाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष जय एंगडे, तालुका उपाध्यक्ष सचिन नरनवरे, तालुका कोषाध्यक्ष गंगाधर प्रजापती, भूषण भुजबळ, सुरेंद्र नरवाडे, संजय सूर्यवंशी, सोपान वेडे आदी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या