🌟पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी आज बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली माहिती🌟
नांदेड (दि.२६ डिसेंबर २०२४) :- नांदेड येथील एका व्यापाऱ्याला मी रिंधाचा शुटर आहे असे सांगून २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीला नांदेड पोलिसांनी २४ तासात अटक केली असून त्याला नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर तेथे मोबाईल जबरी चोरीचा दाखल आहे. पोलीस अधीक्षकांनी आज बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, एका व्यापाऱ्याला खंडणी मागताना मी रिंदाचा शुटर आहे असे सांगून एका युवकाने घरच्या लोकांची आवागमन, वास्तव्य, कामकाज यासंदर्भाने सर्व माहिती दिली. त्यामुळे तो व्यापारी घाबरला त्यामुळे त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अत्यंत मेहनत घेवून अवतारसिंघ प्रतापसिंघ सिकलकर (३४) रा. लातूर रोड वसरणी यास पकडले. तो दि.२५ डिसेंबर रोजी बळजबरीने चोरलेल्या एका मोबाईलवरुन त्या व्यापाऱ्याला धमक्या देत होता. या व्यक्तीविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. त्यासंबंधाने त्याला सध्या नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याच्याकडून सध्या एक दुचाकी, खंजीर आणि बळजबरी चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. हा मोबाईल त्याने ३ डिसेंबर रोजी चोरला होता.
हि कामगिरी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एच. घोगरे, पोलीस उपनिरीक्षक मारोती चव्हाण, हरजिंदरसिंघ चावला यांच्यासह पोलीस अंमलदार साहेबराव कदम, राजीव बोधगिरे, शेख इस्रायल, अनिल बिरादार, आकबर पठाण, राजेंद्र सिटीकर आणि दिपक ओढणे यांच्यासह रिंदा पथकात नियुक्तीस असलेल्या तानाजी येळगे, देवा चव्हाण, मोतीराम पवार यांनी पूर्ण केली......
0 टिप्पण्या