🌟राज्यातील राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ५३ टक्के महागाई भत्ता मिळणार....!


🌟केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किमान तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता🌟

मुंबई :- केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात ५३% झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि पेन्शन धारक ५३ टक्के महागाई भत्ता कधीपासून लागू होणार याकडे लक्ष ठेवून आहेत. येत्या काही दिवसांनी नव्याने सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारकडून या संदर्भात निर्णय होणार आहे.असे असतानाच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खरे तर, - खउझख निर्देशांकाच्या अर्धवार्षिक डेटावर अवलंबून, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे डीए/ डीआर दर केंद्र सरकार दरवर्षी दोनदा सुधारित करत असते. ही वाढ दरवर्षी जानेवारी/जुलैपासून केली जाते. वर्ष २०२४ बद्दल बोलायचे तर, जानेवारी २०२४ पासून महागाई भत्ता ४% आणि जुलै पासून ३ टक्क्यांनी वाढवण्यात आला. त्यानंतर ऊच्चांक ५३% झाला आहे. दरम्यान, आता पुढील वाढ जानेवारी २०२४ पासून होणार आहे, ज्याची घोषणा नवीन वर्षात सादर होणाऱ्या बजेटनंतर होण्याची शक्यता आहे.

खरे तर दरवर्षी केंद्रातील सरकार मार्च महिन्यात जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता वाढ होत असते. यानुसार जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय मार्च २०२५ मध्ये होऊ शकतो. ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत करण्यात येणार आहे.सध्या ४८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना ५३% डीएचा लाभ मिळत आहे. आता पुढील ऊ जानेवारी २०२५ पासून वाढवला जाणार आहे, जो - खउझख निर्देशांकाच्या सहामाही डेटावर अवलंबून असेल.जुलै ते डिसेंबर या महिन्यातील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ही महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की आत्तापर्यंत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीतील आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी पाहिली असता - खउझख निर्देशांक क्रमांक १४४.५ आणि ऊऊन स्कोअर ५५.०५% वर पोहोचला आहे, अशा परिस्थितीत ऊ मध्ये ३% वाढ होण्याची खात्री आहे. पण अजून नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आकडे आलेले नाहीत. यामुळे जेव्हा नोव्हेंबर आणि डिसेंबर चे आकडे समोर येतील तेव्हाच प्रत्यक्षात महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे. परंतु आतापर्यंतची आकडेवारी पाहिली असता एवढे स्पष्ट झाले आहे की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किमान तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नव्या वर्षात ५६% पर्यंत पोहोचणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या