🌟सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने बांगलादेशचा राष्ट्रपती मोहम्मद युनूस याचा पुतळा जाळून केला गेला जाहीर निषेध🌟
पुर्णा (दि.१० डिसेंबर २०२४) :- पुर्णा शहरात आज मंगळवार दि.१० डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदू धर्मीय बांधवावर होत असलेल्या अमानुष अन्याय अत्याचाराच्या विरोधात भव्य मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू धर्मीय नागरिकांना तात्काळ सुरक्षा प्रदान करण्यात येऊन त्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी पुर्णा शहरात आज मंगळवार दि.१० डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता जागतिक मानवाधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुना मोठा परिसरातील श्रीराम मंदिर देवस्थान येथे श्री हनुमान चालीसाचे पठण व प्रभू श्रीरामांची आरती करून सकल हिंदू धर्मिय समाज बांधवांच्या वतीने भव्य मुक मोर्चा सुरुवात झाली हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे आगेकूच करत महात्मा बसवेश्वर चौक, कमाल टॉकीज,आनंदनगर ते धर्मवीर संभाजी महाराज चौक आल्यानंतर या भव्य हिंदू मुक मोर्चाची याठिकाणी सांगता करण्यात आली यावेळी उपस्थित काही हिंदू समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी तहसिल प्रशासनाच्या वतीने नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांनी सकल हिंदू समाज बांधवांचे निवेदन स्वीकार करून घेतले यानंतर सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद युनुस याचा पुतळा जाळून जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी सकल हिंदू समाज बांधवां सोबतच व्यापारी,तरुण,सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते......
0 टिप्पण्या