🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.......!


💥जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी,कोल्हापुरात लाचखोर एपीआय,पीएसआयसह तिघांवर गुन्हा💥

💫विरोधकांचं फेक नरेटिव्ह उद्ध्वस्त केलं, अधिक मतांच्या विरोधकांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर आसूड, ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर ;अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील यासाठी शुभेच्छा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मिश्कील वक्तव्य, आपण आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह भेदल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा  

💫वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात काय परिस्थिती उद्भवेल हे सांगता येणार नाही, डोळ्यात पाणी आणत आमदार संदीप क्षीरसागरांनी सांगितला हत्याकांडाचा भयावह घटनाक्रम

💫वाल्मिक कराड हाच बीडचं शासन चालवतो, पोलिसांच्या बदल्याही त्याच्या मर्जीने होतात,काँग्रेसचे नाना पटोले यांचा विधानसभेत आरोप 

💫वसुलीबाजांना सोडणार नाही, सगळ्यांच्यावर कारवाई करणार, मस्साजोग सरपंच हत्याकांडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

💫बीडचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या  फटक्यांनी  दीड तास पाठीवर वार केले,  पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर ; बीड हत्येची चौकशी CID पोलिस महासंचालक करणार, तपासाची कार्यकक्षा गृहविभाग ठरवणार 

💫पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांना महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री करण्यासाठी माझा आग्रह, नाराज छगन भुजबळांनी केली उपकारांची आठवण

💫सर राम शिंदेंना क्लास कसा चालवायचा हे चांगलं माहिती, विधान परिषदेच्या सभापती बिनविरोध निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य  ; मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा मंत्री झाला असता आणि गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची फटकेबाजी  ; गिरीश, कधी तरी सुधर रे, आताही कट होता होता वाचलास, उपमुख्यमंत्री अजित पवारांची टोलेबाजी 

💫अमित शाहांविरोधात संसद परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान धक्काबुक्की, भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी, राहुल गांधींवर धक्काबुक्कीचा आरोप, तर भाजप खासदारांनी धक्काबुक्की केल्यानं गुडघ्याला दुखापत झाल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप 

💫जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी, कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल 

💫पुण्यातील नामांकित व्यावसायिकला 4 कोटींचा गंडा घालणारी रीलस्टार गुढीया उर्फ सानिया सिद्धकी पुणे पोलिसांच्या जाळ्यात, सापळा रचत बिहारमधून अटक 

💫पुण्यातील नामांकित शाळेतील अल्पवयीन मुलांवर डान्स टिचरकडून लैंगिक अत्याचार,पोलिसांनी संस्थाचालकाला उचललं 

💫बेळगाव केंद्रशासित करा अशी मागणी करत असाल तर मुंबई देखील केंद्रशासित करा, कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांची मागणी 

💫आम्ही रक्त सांडून मुंबई मिळवली, काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांच्या आमदाराला समज द्यावी, आदित्य ठाकरेंची मागणी 

💫कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची 5 फुटांनी वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यावर पुराचं संकट वाढणार 

💫एकनाथ शिंदेंचे खासदार रविंद्र वायकर यांना दिलासा, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली 

💫काँग्रेसने नेहमी बाबासाहेबांचा अपमान केला, भाजपच्या युवा मोर्चाचा आरोप, मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला, पोलिसांकडून लाठीचार्ज  

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या