🌟महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी बाल निरीक्षण गृहातील मुलांना 'इरा' तर्फे खाऊ वाटप....!


🌟याप्रसंगी देवानंद वाकळे यांनी उपस्थितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाशन टाकणारे भाषण दिले🌟


परभणी - युगपुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि.6 डिसेंबर 2024 रोजी बाल निरीक्षण गृहांमधील मुलांना 'इरा' तर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.

 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, 'संविधान' कर्ते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 व्या महापरिनिर्वाण दिनी,येथील वृंदावन काॅलनी मधील लक्ष्मी प्रतिष्ठान संचलित बाल निरीक्षण गृहामध्ये, इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल तर्फे मुलांना खाऊचे वाटप,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ,धर्मभुमी चे संपादक जेष्ठ पत्रकार, मदन (बापू )कोल्हे व 'इरा'चे मीडिया चीफ,मा.विशेष कार्यकारी अधिकारी,वैभवज्वाला चे संपादक देवानंद शंकरराव वाकळे यांचे हस्ते करण्यात आले सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहाराने आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. या वेळी बाल निरीक्षण गृहाचे काळजीवाहक सुरेश वाघमारे व देविदास मेहत्रे तसेच 'वैभव ज्वाला' चे प्रतिनिधी सारीपुत्र वाकळे हे उपस्थित होते.

याप्रसंगी देवानंद वाकळे यांनी उपस्थितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाशन टाकणारे भाषण देऊन ,जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे आचार, विचार, आचरणात आणून जीवन समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या