🌟परभणी शहरातील संवेदनशील भागांना विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिल्या भेटी....!


🌟कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नका : शहाजी उमाप यांनी दिला जाळपोळ दगडफेक करणाऱ्यांना इशारा🌟 


परभणी (दि.११ डिसेंबर २०२४) : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आज परभणीत दाखल होताच शहरातील संवेदनशील भागांना भेटी दिल्या यावेळी शहरात दगडफेकीसह जाळपोळ करणाऱ्यांना त्यांनी कायदा व सुव्यवस्था हातात घेवून परिस्थिती चिघळविण्याचा कोणीही प्रयत्न करु नये असा इशारा देखील दिला आहे दरम्यान दुपारी विशेष पोलिस महानिरीक्षक उमाप यांच्या आदेशानंतर परभणी जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर आल्यानंतर बऱ्याच प्रमाणात परिस्थिती आटोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. 

          नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी बुधवारी दुपारी परभणीत दाखल झाल्याबरोबर परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांबरोबर चर्चा केली त्या पाठोपाठ शहरातील संवेदनशील भागांना देखील त्यांनी भेटी दिल्या व तेथील स्थितीची पाहणी केली. बंदोबस्तावरील अधिकार्‍यांना कर्मचार्‍यांना सक्त सूचना दिल्या. पाठोपाठ माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना मंगळवारी सायंकाळची संविधानाच्या प्रतिकृतीच्या तोडफोडीची घटना निश्‍चितच दुर्देवी आहे. पोलिसांनी या प्रकरणात संबंधित आरोपी विरुध्द गुन्हे दाखल केले आहेत तो ताब्यात आहे. त्याबाबत आणखीनही कसून चौकशी सुरु आहे. विशेषतः मंगळवारीच प्रशासनाने तात्काळ शांतता समितीची बैठक बोलावून सर्वांबरोबर तपशीलवार चर्चा केली. स्थिती निदर्शनास आणून दिली. यावेळी बंद पुकारणार्‍या संघटनांच्या प्रतिनिधींनी बुधवारी केवळ आम्ही निवेदन देवू तेही शांततेच्या मार्गाने असा शब्द दिला होता परंतु बुधवारी निवेदन देण्यासाठी येतांना आंदोलनकर्त्यां काही कार्यकर्त्यांनी व्यापार्‍यांच्या बोर्डसवर, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर दगडफेक केली. वाहनांचे टायर जाळले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातसुध्दा धुडघूस घातला या आंदोलनकर्त्यांना आम्ही बाहेर काढले आहे. कार्यालयासह पुतळा परिसरसुध्दा मोकळा केला आहे. सर्वत्र पेट्रोलिंगसुध्दा वाढविण्यात आली आहे अन्य उपाययोजनाही करण्यात येवू लागल्या आहेत असे श्री उमाप यांनी नमूद केले. 

जिल्हा पोलिस दलाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. पोलिस मुख्यालयाचे मनूष्यबळही तैनात करण्यात आले आहे. एसआरपीएफच्या कंपन्याही दाखल झाल्या असून स्थिती नियंत्रणात आणण्याकरीता सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले आंदोलनकर्त्यांनी कायदा व सुव्यवस्था हातात घेवू नये, असा इशारा देवून उमाप यांनी जे नुकसान झाले आहे ते दुर्देवी आहे रितसर नोंद झाली असतांना आरोपी अटकेत असतांना या प्रकारे प्रशासनास धारेवर धरण्याचा प्रकार योग्य नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या