🌟राज्याचे कॅबिनेट मंत्री संजयजी शिरसाट यांचे उद्या शनिवारी २१ डिसेंबर रोजी संभाजीनगरात आगमन....!

 


🌟शिवसेनेतर्फे भव्यदिव्य व जंगी स्वागताची तयारी  : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण🌟

✍️ मोहन चौकेकर

संभाजीनगर : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री संजयजी शिरसाट यांचे उद्या  २१ डिसेंबर शनिवारी सायंकाळी ६:०० वा.संभाजीनगर शहरात आगमन होत असून त्यांच्या स्वागताची  भव्य दिव्य  व जंगी  तयारी करण्यात येत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले आहे.विधानसभा २०२४ ची निवडणूक नुकतीच पार पडली या  निवडणुकीत जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मंत्री संजयजी शिरसाट चौथ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले.


यानंतर  लगेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्व संध्येला आमदार संजय शिरसाट यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाली. या निवडीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.हिवाळी अधिवेशनाच्या समारोपनंतर  कॅबिनेट मंत्री संजयजी शिरसाट यांचे  प्रथमच संभाजीनगरात आगमन होणार असून यानिमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेऊन कॅबिनेट मंत्री संजयजी शिरसाठ यांच्या स्वागताची  भव्य दिव्य व जंगी तयारी करण्याबाबत सूचना केल्या. कॅबिनेट मंत्री संजयजी शिरसाट हे  संभाजीनगर मध्ये आल्यानंतर सिडको बस स्टँड, अग्रसेन चौक, सेव्हन हिल,  आकाशवाणी चौक, होंडा नाका ,अमरप्रित चौक , क्रांती चौक,   कोकणवाडी चौक  कोकणवाडी  येथील संपर्क कार्यालयापर्यंत चारचाकी, दुचाकीची मिरवणूक रॅली काढण्यात येणार असून या मार्गावर ठिकठिकाणी तसेच मुख्य चौकात भव्य दिव्य व जंगी स्वागत करण्यात येणार आहे. या वेळी नागरिक, पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना संभाजीनगरच्या वतीने करण्यात आले आहे......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या