🌟परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभाग सर्वार्थाने अकार्यक्षम : नियमबाह्य दारुविक्रेत्यांशी हितसंबंध जोपासण्यात मात्र सक्षम ?


🌟सार्वजनिक रस्त्यांसह धार्मिक स्थळ व महापुरुषांच्या स्मारकालगत असलेली देशी/विदेशी दारू दुकान ठरताय अत्यंत धोकादायक🌟


परभणी (विशेष वृत्त) :- परभणी जिल्ह्यातील सर्वात अतिसंवेदनशील शहर म्हणून शासकीय दफ्तरी नोंद असलेल्या पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैध बनावट देशी/विदेशी देशी दारुची मोठ्या प्रमाणात विक्रीसह ग्रामीण भागात दुचाकी/चारचाकी वाहनांच्या सहाय्याने तस्करी देखील होते या संपूर्ण गैर कारभाराची सुत्र शहरातील अधिकृत देशी/विदेशी दारू विक्रेतेच असल्याचे अनेक वेळा निष्पन्न झाले परंतु परभणी जिल्ह्यातील संपूर्ण राज्य उत्पादन शुल्क विभागाच संबंधित अनधिकृत/अनधिकृत देशी/विदेशी दारू विक्रेत्यांच्या दावणीला बांधला गेला असल्याने या अवैध देशी/विदेशी दारुसह बनावट दारू विक्रीचा जिवघेणा कुटील उद्योग सोईस्कर रित्या चालवणाऱ्यांवर शेवटी कारवाई करणार कोण ? पुर्णा शहरासह तालुक्यातील दंगलींसह घडलेल्या घटनांचा मागील इतिहास पाहता असे निदर्शनास येते की या सर्वच घटनांना एकमेव कारण शहरासह तालुक्यातील सार्वजनिक रस्त्यांवरील खानावळींच्या नावावर चालणाऱ्या धाब्यावर मोठ्या प्रमाणात होणारी अवैध देशी/विदेशी दारू तसेच धार्मिक स्थळ/महापुरुषांच्या स्मारक परिसरालगत अधिकृत/अनधिकृत देशी/विदेशी दारू विक्रीची नियमबाह्य चालणारी दुकान देखील शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या उद्भवणाऱ्या गंभीर प्रश्नाला कारणीभूत ठरत आहे.


पुर्णा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवरील में.जयस्वाल वाईन शॉप व लोकमान्य टिळक रोडवरील वसंतलाल जयस्वाल यांची देशी दारू दुकान तात्काळ हटवण्यात यावी याकरिता परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकांकडे मागील वर्षी दि.११ डिसेंबर २०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी लेखी स्वरूपात तक्रार अर्जाद्वारे केली होती या तक्रारीची दखल घेऊन परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश द.पाटील यांनी दि. २० डिसेंबर २०२३ रोजी आदेश क्रमांक डिईटी ११२०२३/२४७४/अधी/१४६२ अन्वये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक परभणी यांच्या नावे आदेश पारित करुन पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेशीत करुन में जयस्वाल वाईन शॉप डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड पुर्णा येथील एफ एफएल-२ नंबर ०७/२०२१-२६ व सीएल-३ क्रमांक १५/२०२०-२१ चे स्थलांतर करणे बाबतच्या तक्रारी संदर्भात उल्लेख करीत सदरील दोन्ही दुकान विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे तसेच दोन्ही दुकान रहदारीच्या ठिकाणी असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिला विद्यार्थी/विद्यार्थीनी, जेष्ठ नागरिक, अपंग यांना अडचणीचे ठरत असल्याने सदर प्रकरणी सखोल चौकशी करून त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल तात्काळ सादर करण्याचे देखील आदेशात नमूद केले होते.


 या संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदरील देशी/विदेशी दारू दुकान स्थलांतरित करण्याचे आदेश निघाल्यानंतर यातील में जयस्वाल वाईन शॉप रेल्वे स्थानक परिसरातील श्रध्दा बिअर बार मध्येच नियमबाह्य पद्धतीने स्थलांतरित करण्यात आली खरी परंतु पुर्वीच्या आंबेडकर रोडवरील में जयस्वाल वाईन शॉपच्या जागेवर मात्र परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासत नियमबाह्य पद्धतीने जुना मोंढा परिसरातील नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील समर्थ बिअर शॉपी बसवण्यात आली याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश द.पाटील यांच्या आदेशाला मुठमाती देऊन लोकमान्य टिळक रोडवरील वसंतलाल जयस्वाल देशी दारू दुकानाला स्थलांतरित करणे जाणीवपूर्वक टाळले त्यामुळे एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर देखील लोकमान्य टिळक रोडवरील या परिसरातील वसंतलाल जयस्वाल देशी दारू दुकान याच परिसरात नियमबाह्य पद्धतीने चालत असून या परिसरातील सातत्याने वादविवादाला कारणीभूत ठरत आहे.


पुर्णा शहरातील डॉ आंबेडकर रोड,लोकमान्य टिळक रोड या परिसरापेक्षाही भयंकर परिस्थिती महाविर नगर, शास्त्री नगर रेल्वे स्थानक परिसराची झाली असून या परिसरातील बिअरबार वाईन शॉप तसेच परिसरातील अजमेरा देशी दारू अड्डा या उच्चभ्रू वसाहतीतील रहिवाशांसह या परिसरातील भगवान महावीर मंदीर, अजमेरा देशी दारू अड्ड्या लगतच असलेल्या दुर्गामाता मंदिरासाठी धोकादायक ठरत असून या धार्मिक स्थळांचे पावित्र्य या या परिसरातील अजमेरा देशी दारू अड्डा व परिसरातील बिअर बार, वाईन शॉप मुळे धोक्यात आले आहे असून या परिसरातच रेल्वे स्थानक असल्यामुळे या परिसरात अट्टल गुन्हेगारांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात वाढली असून परिसरातील रहिवाशांचे जनजीवन धोक्यात आले आहे...........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या