🌟तिन्ही वीज कंपनीच्या तांत्रिक कामगारांकरिता मुदतपूर्व स्वेच्छा निवृती योजना राबवा.....!


🌟तांत्रिक कामगार युनियनची राज्याच्या ऊर्जामंत्री यांच्याकडे मागणी🌟 

नागपूर :- महावितरण ,महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील वर्ग 3 व 4 4 च्या सर्व तांत्रिक कामगारांकरिता मुदतपूर्व स्वेच्छा निवृत्ती योजना राबवावी अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री व तिन्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.

विज कंपनीतील तांत्रिक कामगारांच्या सर्वोतोपरी व कष्टाळुवृत्ती मुळे महाराष्ट्र शासनानी केवळ शहरच नव्हे तर दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील खडीपाडी वाड्यावस्त्यांमधुन राहणाऱ्या शेवटच्या घटकांनाही विज पुरवठा देण्याचे उद्दिष्ट पुर्ण केले आहे. हे करीत असतांना अनेक तांत्रिक कामगारांना प्राणाची आहुती द्यावी लागली तसेच अनेक तांत्रिक कामगारांचे अप्राणांतिक अपघात झाले. त्यांना अद्यापही वेदना सहन करावे लागत आहेत. त्यांना त्यांचे नियमित कामे करण्यास अडचण निर्माण होत आहे.

अशा सर्व बाबीचा विचार करून तिन्ही कंपनीतील कार्यरत वर्ग 3 व 4 च्या (तंत्रज्ञ/यंत्रचालक) तांत्रिक कामगारांकरीता ज्यांच्या कडे 2 वर्ष सेवा शिल्लक आहे अशांना "मुदतपुर्व स्वेच्छा निवृती योजना" राबवुन कुटुंबातील वारसास त्यांच्या शैक्षणिक अर्हते नुसार नोकरी द्यावी अशी मागणी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर. पवार, सतिश भुजबळ, गोपाल गाडगे, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस नितीन चव्हाण, शिवाजी शिवणेचारी, संजय उगले, राज्य संघटक महेश हिवराळे, आर. आर. ठाकुर, राज्य सचिव आनंद जगताप, रघुनाथ लाड, प्रकाश निकम, कोषाध्यक्ष गजानन अघम, मुख्य कार्यालय प्रतिनीधी दत्तु भोईर, किरण कऱ्हाळे, प्रकाश वाघ, तांत्रिक टाईम्स संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर, प्रसिध्दी प्रमुख अनिल सरोदे, विक्की कावळे, प्रदीप पाटील यांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या