🌟हैद्राबाद विभागातील रोलिंग ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्यांवर परिणाम :🚉 काही रेल्वेगाड्या रद्द तर काही अंशतः रद्द....!


🌟अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने दिली आहे🌟 


नांदेड : हैद्राबाद विभागातील रोलिंग ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला असून त्यामुळे काही रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने दिली.

             गाडी संख्या 17687 मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस 10 ते 15 डिसेंबर दरम्यान नांदेड-धर्माबाद दरम्यान रद्द असणार आहे. तर 17688 धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस 11 ते 16 डिसेंबर दरम्यान धर्माबाद नांदेड दरम्यान रद्द असणार आहे. 11409 दौंड-निजामाबाद डेमू ही गाडी 10 ते 15 डिसेंबर दरम्यान मुदखेड-निजामाबाद दरम्यान तर 01413 निजामाबाद-पंढरपूर डेमू ही गाडी 11 ते 16 डिसेंबर दरम्यान निजामाबाद ते मुदखेड दरम्यान रद्द असणार आहे. या व्यतिरिक्त सिकंदराबाद विभागातील रामगुंडम राघवपुरम स्थानका दरम्यान मालगाडी घसरल्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे. त्यात 07598 परळी-पूर्णा, 07599 पूर्णा-परळी, 07853 निजामाबाद-नांदेड, 07854 नांदेड-निजामाबाद रेल्वे 14 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. 11409 दौंड निजामाबाद, 13 डिसेंबर रोजी मुदखेड-निजामाबाद दरम्यान तर 01413 निजामाबाद - पंढरपूर, 14 डिसेंबर रोजी निजामाबाद-मुदखेड दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या