🌟पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील गुरु जमदास महाराज प्राथमिक विद्यालयाचा संकलित मूल्यमापन निकाल जाहीर....!


🌟यामध्ये गुरु जमदास महाराज प्राथमिक विद्यालयाचा निकाल लागला शंभर टक्कें🌟


पुर्णा (दि.०१ नोव्हेंबर २०२४) :- पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील गुरु जमदास महाराज प्राथमिक विद्यालय या शाळेचा संकलित मूल्यमापन निकाल काल शनिवार दि.३० नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर झाला यामध्ये गुरु जमदास महाराज प्राथमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे तसेच या निकालांतर्गत वर्गानुसार पहिला व दुसरा क्रमांक काढण्यात आलेला असून यात प्रथम/द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या वर्ग शिक्षकाकडून सत्कार देखील करण्यात आला आहे सदरील निकाल शाळेचे मुख्याध्यापक देसाई सर यांनी जाहीर केलेला आहे

चुडावा येथील गुरु जमदास महाराज प्राथमिक विद्यालयाचा संकलित मूल्यमापन निकालात पहिल्या वर्गामधून पहिला क्रमांक पटकावलेला विद्यार्थी कु.विराज नामदेव देसाई या विद्यार्थ्याला ६०० पैकी ५४६ (९१% गुण) तसेच याच वर्गातील पार्थ जयदेव देसाई याचा दुसरा क्रमांक आला असून त्याला ६०० पैकी ५४३ तर याच वर्गातील श्रेया सतीश ईडोळे या विद्यार्थ्यांनीला ६०० पैकी ५४३ गुण मिळाले असून या विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचा वर्गशिक्षिका पाचकोर मॅडम यांनी केला आहे.

तर वर्ग दुसरा मधुन पहिला क्रमांक सोपान रामेश्वर देसाई या विद्यार्थ्याचा आला असून त्याने ६०० पैकी ५४६ तर याच वर्गातून दुसरा क्रमांक कु.सानव्ही सूरज खैरे हिचा आला असून तिला ६०० पैकी ५४४ गुण मिळाले आहे तर तिसऱ्या वर्षातून कु.प्रेक्षा संतोष देसाई हिने ३०० पैकी २५२ वर्ग याच वर्गातून प्रेक्षा हनुमंता देसाई हिने ७०० पैकी ६२० तर रितेश सुरेश देसाई या विद्यार्थ्यांने ७०० पैकी ५९९ गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला असून त्यांचा देसाई मॅडम यांनी सत्कार केला 

 तर पाचव्या वर्गातून कु.श्रावणी विठ्ठल देसाई हिने ३०० पैकी २५७ गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे तर सहाव्या वर्गातून शिवराज वामन देसाई या विद्यार्थ्यांने ९०० पैकी ८३९ गुण मिळवून पहिला क्रमांक तर विश्रांती दत्तराव देसाई या विद्यार्थ्यांनीने ९०० पैकी ८१५ गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे तर सातव्या वर्गातून प्रगती दादाराव घयाळ पहिला व दुसरा क्रमांक पूनम शहाजी देसाई यांनी मिळवला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या