🌟तुळजापुरातील मेसाई जवळगा येथील सरपंचाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न...!


🌟मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांना पवनचक्कीच्या वादातून गुंडांनी जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न🌟

तुळजापूर :- बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीवरील वादातून झालेली निर्घृण हत्येचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रासह राज्यातील विधानसभा/विधान परिषद व लोकसभा/राज्यसभेत गाजत असतांनाच तुळजापूर मध्ये देखील या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न गुंडांनी केल्याने खळबळ उडाली आहे तुळजापुरातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर देखील पवनचक्कीच्याच वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय त्यामुळे तुळजापूरमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे या धक्कादायक घटनेमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला असून सरपंचांवर होणाऱ्या हल्ल्यांना पवनचक्की वादच कारणीभूत ठरत असल्याने आता पवनचक्क्यांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

या घटने संदर्भात अधिक माहिती अशी की तुळजापुरातील मेसाई जवळगा गावाचे सरपंच नामदेव निकम बारुळ येथून आपल्या मेसाई जवळगा या गावाच्या दिशेने जात असतांना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला परंतु सुदैवाने सरपंच नामदेव निकम या हल्ल्यात बचावले आहेत बारूळ गावाजवळ मध्यरात्री ०१.०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ देखील होता यावेळी अचानक काही गुंडांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा देखील प्रयत्न केलाय. हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय.

सरपंच नामदेव निकम बारुळवरून मेसाई जवळगा गावाच्या दिशेने चालले होते गाडी चालवत असताना अचानक त्यांच्या गाडीला दोन बाईकने घेरलं. बाईकस्वारांनी निकम यांच्या गाडीवर हल्ला करण्यास सुरूवात केली. दरवाजाची काच फोडून त्यांनी पेट्रोलचे फुगे गाडीत फेकले. त्यानंतर निकम यांनी गाडीचा वेग वाढवला. परंतु बाईकवरील गुंडांनी गाडीच्या काचेवर अंडी फेकली. त्यानंतर त्यांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती खुद्द सरपंच नामदेव निकम यांनी दिली आहे. या घटनेमुळे धाराशिव परिसरात भितीचं वातावरण आहे. या प्रकरणी पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या कधी आवळतात, याकडे अख्ख्या धाराशिवकरांचं लक्ष लागलेलं आहे.

बिड जिल्ह्यात मागील काही दिवसांत दोन सरपंचांच्या हत्या झाल्यात केज तालुक्यातील मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख आणि परळी वैजनाथ येथील बापू आंधळे यांची हत्या झाली होती. त्यामुळे सध्या राजकारण चांगलंच तापलंय. राज्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. याच घटनेची पुनरावृत्ती धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये होताना दिसतेय. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून थेट जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेलाय.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या